JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs AUS 2nd ODI : याच्या ऐवजी संजू सॅमसनला खेळवा! वनडे क्रिकेटमधील फ्लॉप शोमुळे सूर्यकुमार यादव झाला ट्रोल

IND vs AUS 2nd ODI : याच्या ऐवजी संजू सॅमसनला खेळवा! वनडे क्रिकेटमधील फ्लॉप शोमुळे सूर्यकुमार यादव झाला ट्रोल

. टी 20 मॅच मध्ये भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सूर्यकुमार यादव वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या फलंदाजीची कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला सोशल मिडीआयवर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

जाहिरात

याच्या ऐवजी संजू सॅमसनला खेळवा! वनडे क्रिकेटमधील फ्लॉप शोमुळे सूर्यकुमार यादव झाला ट्रोल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विशाखापट्टणम येथे वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. 26 ओव्हरमध्ये अवघ्या 117 धावा करून भारतीय संघ सर्वबाद झाला.  टी 20 मॅच मध्ये भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सूर्यकुमार यादव वनडे क्रिकेटमध्ये मात्र त्याच्या फलंदाजीची कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला सोशल मिडीआयवर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. टी 20 क्रिकेटमधील सूर्यकुमारचा परफॉर्मन्स पाहून त्याला वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली होती. परंतु सूर्यकुमार त्याच्या फलंदाजीतली ही लकब वनडे मध्ये दाखवू शकला नाही. मुंबईतील वानखेडे येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात संघाला गरज असताना देखील सूर्या अवघ्या काही धावा करून बाद झाला. तर आज दुसऱ्या वनडे सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. सूर्याच्या लागोपाठ फ्लॉप परफॉर्मन्समुळे सोशल मिडीआयावर त्याला ट्रॉल केलं जात आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

सूर्यकुमारच्या वनडेतील खराब परफॉर्मन्समुळे नेटकरी संजू सॅमसनला पुन्हा भारतीय संघात स्थान देण्याची मागणी करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या