JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL

WTC Final 2021: अश्विन आऊट होताच पत्नी प्रीती निराश, प्रतिक्रिया VIRAL

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final 2021) तिसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. आर.अश्विन आऊट होताच त्याची पत्नी प्रीती नारायण (Prithi Narayan) निराश झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साऊथम्पटन, 21 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final 2021) तिसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 146 असा स्कोर करणारी भारतीय टीम 217 रनवर ऑल आऊट झाली. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडनं 2 आऊट 101 रन काढले आहेत. टीम इंडियाचा एकही खेळाडू पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावू शकला नाही. विराट कोहली (Virat Kohli) 44 तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 49 रन काढून आऊट झाला. अजिंक्य आऊट झाल्यानंतर आर. अश्विन मैदानात आला. टेस्ट कारकिर्दीमध्ये पाच शतक झळकावणाऱ्या अश्विनवर टीम इंडियाची मोठी भिस्त होती. अश्विननं सुरुवात चांगली केली होती. त्याने तीन फोर लगावत आक्रमक खेळ करणार असल्याचं जाहीर केलं. अश्विनच्या खेळीमुळे टीम इंडियानं 200 रनचा टप्पा पार केला. त्यानंतर लगेच अश्विन आऊट झाला. टीम साऊदीच्या बॉलिंगवर टॉम लॅथमनं त्याचा कॅच घेतला. अश्विननं 27 बॉलमध्ये 22 रन काढले आहेत. अश्विन आऊट होताच त्याची पत्नी प्रीती नारायण (Prithi Narayan) निराश झाली. तिने तात्काळ ट्विटरवर ‘अय्यो’ या एकाच शब्दात तिची प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रितीचं हे एका शब्दाचं ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे.

संबंधित बातम्या

विराटच्या सहकाऱ्यानं मोडला 72 वर्ष जुना रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच बॉलर अश्विननं घेतली पहिली विकेट तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दिवसाअखेरीस न्यूझीलंडनं 2 आऊट 101 रन काढले होते. न्यूझीलंड अजूनही 116 रनने पिछाडीवर आहे. दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये भारताला दोन विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी टीमला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. टॉम लेथम 30 रनवर तर डेवॉन कॉनवे 54 रनवर आऊट झाला. लेथमला अश्विनने आणि कॉनवेला इशांत शर्माने आऊट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या