JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women T20 World Cup : टीम इंडियाला दुखापतीच ग्रहण! स्मृती मानधना पाक विरुद्धच्या सामन्यातून बाहेर

Women T20 World Cup : टीम इंडियाला दुखापतीच ग्रहण! स्मृती मानधना पाक विरुद्धच्या सामन्यातून बाहेर

आयसीसीच्या महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली असून रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही प्लेयिंग 11 मधून बाहेर राहण्याची शक्यता आहे.

जाहिरात

दुखापतीमुळे भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी :  टीम इंडियाच्या पुरुष संघानंतर आता महिला संघालाही दुखापतीच ग्रहण लागलं आहे. शुक्रवार पासून आयसीसीच्या महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली असून रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना ही प्लेयिंग 11 मधून बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या महामुकाबल्या पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 6 फेब्रुवारी रोजी  महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होण्यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान फिल्डिंग करीत असताना स्मृती मानधना हिच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर संघाकडून फलंदाजीसाठी आलेली स्मृती केवळ तीन चेंडू खेळून बाद झाली. या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल आव्हान पूर्ण न करता आल्याने टीम इंडियाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत झालेल्या दुखापतीनंतर स्मृती बुधवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सराव लढतीतही खेळू शकली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृती मानधना या महिला टी 20 वर्ल्ड कपला मुकणार की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु स्मृती उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणाऱ्या सलामी सामन्यात प्लेयिंग 11 मधून बाहेर राहणार असे बोलले जात आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेदरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या ही खांद्याला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बारी झालेली नाही.  तेव्हा महामुकाबल्या पूर्वी भारताचे दोन्ही महत्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने टीम इंडियावर मोठे दडपण असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या