JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women T20 WC : स्मृती मानधना, हरमनप्रीत दुखापतग्रस्त! भारत-पाक सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेयिंग 11

Women T20 WC : स्मृती मानधना, हरमनप्रीत दुखापतग्रस्त! भारत-पाक सामन्यासाठी अशी असेल भारताची प्लेयिंग 11

आज होणाऱ्या भारत पाक सामन्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. परंतु भारताच्या स्टार महिला खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे पाक विरुद्ध सामन्याकरता भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

जाहिरात

पाक विरुद्ध सामन्याकरता भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 फेब्रुवारी : 10 फेब्रुवारी पासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघाशी होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असून स्पर्धेचा पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. परंतु भारताच्या स्टार महिला खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे पाक विरुद्ध सामन्याकरता भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आज 12 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यात भारताची स्टार खेळाडू स्मृती मानधना ही दुखापतीमुळे प्लेयिंग 11 मधून बाहेर राहणार आहे. 6 फेब्रुवारी रोजी  महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होण्यापूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सराव सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान फिल्डिंग करीत असताना स्मृती मानधना हिच्या बोटाला दुखापत झाली होती. हे ही वाचा  : Women T20 World Cup : आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कधी, कुठे पाहाल सामना? भारत पाक सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर यांनी सांगितले की, ‘स्मृतीच्या बोटाला दुखापत झालीये. ती या दुखापतीतून बरं होण्याचा प्रयत्न करतेय. परंतु भारत पाक सामन्यात तिच्या खेळण्याची शक्यता नाही. सुदैवाची गोष्ट म्हणजे तिच्या बोटाला कोणतंही फ्रॅक्चर झालेलं नाही. आम्हाला अपेक्षा आहे की, ती दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेयिंग 11 चा भाग असेल. स्मृती मानधना प्रमाणेच भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या खांद्याला दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हा भारत पाक सामन्यात ती देखील प्लेयिंग 11 बाहेर असेल असे बोलले जात होते. परंतु प्रशिक्षकाने हरमनप्रीत फिट असून ती खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरी झाल्याचे म्हंटले आहे. तसेच ती सामन्यासाठी गेले दोन दिवस नेट प्रॅक्टिस देखील करीत असल्याचे प्रशिक्षक हृषिकेश यांनी सांगितले.

स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत भारताला पहिला अंडर 19 महिला वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार शफाली वर्मा हिच्यावर मोठी खेळी करण्याची जबाबदारी असेल. तसेच मधल्या खेळीत फलंदाजी करणारी अनुभवी खेळाडू जेमिमी रॉड्रिग्जवर देखील संघाच्या फलंदाजीची मदार असेल. सायंकाळी सहा वाजता दोन्ही संघात टॉस पार पडल्यावर भारत पाक सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेयिंग 11 ची घोषणा होईल. अशी असेल भारताची प्लेयिंग 11 : हरमनप्रीत कौर, जेमिमी रॉड्रिग्ज, हरलीन देओल, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, रिचा घोष, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, अंजली सरवानी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या