ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुबंई, 23 फेब्रुवारी : आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडूंनी बाजी मारली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्याशिवाय टॉप 5 मध्ये आणखी दोघेजण आहेत. यात रविचंद्रन अश्विन दुसऱ्या तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये तब्बल 1466 दिवस ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स होता. आता इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने पहिलं स्थान पटकावलं. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉपला पोहोचणारा तो दुसरा वयस्क गोलंदाज ठरला आहे. अश्विन दुसऱ्या आणि जडेजा नवव्या स्थानी आहे. हेही वाचा : ग्लॅमरस आहे सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, पाहा टॉप टेन यादी जेम्स अँडरसनने 87 वर्षे जुना विक्रम मोडताना 40 वर्षे आणि 207 दिवस वय असताना गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलंय. 1936 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेट हे टॉप रँकिंग मिळवणारे सर्वात वयस्क गोलंदाज आहेत.
अष्टपैलू क्रिकेटर्समध्ये रविंद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 460 रँकिंग पॉइंट आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनचे 376 रँकिंग पॉइंट आहेत. एकदिवसीय रँकिंगमध्ये भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज टॉपला असून त्याचे 729 पॉइंट आहेत. तर टी20 रँकिंगमध्ये स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव टॉपला असून त्याचे 906 पॉइंट आहेत.