JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : 'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

World Cup : 'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

सामन्यानंतर रोहित शर्माला ऋषभ पंत बद्दल विचारले असताना, त्यानं असे काही उत्तर दिले की सर्वांना बसला धक्का

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बर्मिंगहम, 1 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारत- इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात विराटसेनेला पराभवाचा पहिला धक्का बसला. सलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे. या पराभवाने भारताचा सेमीफायनल प्रवेश लांबला आहे. 7 पैकी 5 सामने जिंकून भारताने 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतपर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारताला इंग्लंडने पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेन एक पाऊल टाकलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जेसॉन रॉय आणि बेअरस्टो यांनी शतकी भागिदारी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडनं भारतासमोर तब्बल 337 धावांचे बलाढ्या आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 5 विकेट गमवत 306 धावा केल्या. यात इंग्लंडनं तब्बल 13 षटकारांचा वर्षाव केला. मात्र, भारताला आपल्या 50 ओव्हरमध्ये केवळ एक षटकार मारता आला. शेवटच्य ओव्हरमध्ये महेंद्रसिंग धोनीनं हा षटकार मारला. तर, इंग्लंजकडून बेअरस्टोनं 6, स्टोक्सनं 3 तर, जेसन रॉय आणि बटरल यांनी 2-2 षटकार लगावले. भारताकडून रोहित शर्मानं शतकी खेळी केली तर, विराट कोहलीनं 66 धावा केल्या. मात्र भारताच्या मधल्या फळीला चांगली फलंदाजी करता आली नाही. हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी यांची भागिदारी भारताला सामना जिंकून देईल असे वाटत असतानाच पांड्या बाद झाला. या पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजांवर नाराज आहेत. कर्णधार कोहलीनेही चांगली फलंदाजी केली असती तर परिणाम वेगळा असता असे मत व्यक्त केले. मात्र पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शतकवीर रोहित शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळी रोहित शर्माला ऋषभ पंत बद्दल विचारले असताना, त्यानं असे काही उत्तर दिले की सर्वच हैरान झाले.

संबंधित बातम्या

सामन्यानंतर रोहितला पंतविषयी प्रश्न विचारण्यात आला होता की “कोहली बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पंतला पाहून तुला आश्चर्य वाटले नाही का? कारण हार्दिक पांड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्याला पंतच्या जागी पाठवायला हवे होते का”. यावर रोहितनं आपल्या नेहमीच्या मिश्किल अंदाजात उत्तर दिले. रोहित म्हणाला की, ‘‘मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, कारण तुम्ही सगळ्यांना वाटतं होतं की ऋषभ पंतने खेळावे. तो भारतात होता तेव्हापासून ऋषभ पंत कुठे आहे?, असं तुम्ही विचारत होतात. घ्या आता आला आहे तो इकडे आणि खेळतोय चौथ्या क्रमांकावर". रोहितच्या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हशा पिकला. शिखर धवन दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहरे गेल्यानंतर ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरोधात पंतने पदार्पण केले. त्यानं 29 चेंडूत 32 धावा केल्या, मात्र संघाला विजय मिळवून देता आला नाही. पावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या