लंडन, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सर्व सामने रोमांचक होत आहेत. त्यातच एकीकडे लीग स्टेजमधले सामने संपत आले असताना, आता सेमीफायनला थरार सुरु होणार आहे. मात्र, यंदा बलाढ्या संघांवर कमकुवत वाटणारे संघ भारी पडताना दिसत आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो बांगलादेशचा. अफगाणिस्तानला सहज नमवत, आपल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर बांगलादेशनं आपला तिसरा विजय नोंदवला. बांगलादेशचा संघ सध्या गुणतालिकेत 7 गुणांसह 5व्या स्थानावर आहे. त्यामुळं सेमीफायनल गाठण्याची त्यांना संधी आहे. तर, पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे, अपराजित असा न्यूझीलंडचा संघ. किवींनी 6 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना त्यांनी थोडक्यात जिंकला. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे, ऑस्ट्रेलियाचा संघ. ऑस्ट्रेलियानं 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत तर, भारताविरुद्ध त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. आज त्यांची लढत इंग्लंड विरोधात होणार आहे. दुसरीकडे भारताचा संघ 9 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला सध्या जरी धोका नसला तरी, भारताचा पुढील सामना गुरुवारी वेस्ट इंडिज विरोधात होणार आहे. त्यांचा न्यूझीलंड विरुद्धची खेळ पाहता, हा सामना जिंकण्यासाठी भारतालाही चांगलाच जोर लावावा लागणार आहे. भारताचे आता 3 सामने बाकी आहेत, यात बांगलादेश, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.
सध्या सर्वात जास्त धोका तो इंग्लंड संघाला. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या पराभवातून सावरत जोरदार कमबॅक केलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पाकचे 6 सामन्यात 5 गुण झाले आहेत. जर पाकिस्तानने पुढचे तीनही सामने जिंकले तर त्यांना सेमिफायनलला जागा मिळू शकते. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 10 गुण होतील. इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा इंग्लडचे आता तीन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. VIDEO : भारतीय महिला हॉकी टीमचा बसमध्ये विजयी जल्लोष