ट्रेंट ब्रीज, 14 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. मात्र, याच फटका भारताला बसला आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना आतापर्यंत एकाही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. त्यामुळं या सामन्यात दोन गुण मिळवणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. पण पावसामुळं दोन्ही संघांच्या या आशेवर पाणी फेरले आहे. विराटसेनेनं वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला आणि ऑस्ट्रेलियाना नमवल्यानंतर किंवींची शिकार करण्याच सज्ज होता. मात्र पावसामुळं भारताला ती संधी मिळालीच नाही. नाणेफेकही न होता हा सामना रद्द झाला. परिणामी भारतीय संघ 3 सामन्यांध्ये 5 गुणांसह तीसऱ्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंडचा संघ 4 सामन्यात 7 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर, ऑस्ट्रेलियाचा संघ 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंड नॉकआऊटमध्ये पोहचणार ? पावसामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. परिणामी न्यूझीलंड़चा संघ नॉक आऊट फेरीत पोहचण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडनं आतापर्यंत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांना पराभूत केले आहे. भारताच्या विजयावर पावसानं फेरले पाणी हा सामना पावसामुळं रद्द झाला असला तरी, भारत या सामन्यात वरचढ होता. भारतानं न्यूझीलंडला गेल्या 8 एकदिवसीय सामन्यात 6 वेळा विजय मिळवला आहे. तसेच, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवल्यानंतर भारत न्यूझीलंडलाही पराभूत करु शकला असता. उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी