JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind Vs Pak : वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

Ind Vs Pak : वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

भारत-पाकिस्तानचा हाय-वोल्टेज सामना रविवारी मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 12 जून : ICC World Cup 2019मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळं टॉस न होता रद्द झाला. त्यामुळं दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आले. मात्र आता पावसामुळं एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. कारण पावसामुळं गुणतालिकेत संघांना फटका बसत आहे. श्रीलंकेचा संघ सध्या 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर, बांगलादेशचा संघ 3 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. त्यामुळं वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदा पावसामुळं तीन सामने रद्द झाले आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला. त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला. या सामन्याचे केवळ 7.3 ओव्हर खेळले गेलेय आता मंगळवारी पुन्हा एकदा पावसामुळं सामना रद्द झाला. श्रीलंका संघाचे यंदाच्यावर्ल्ड कपमधले 4 सामन्यांपैकी 2 सामने पावसामुळं रद्द झाले आहे. पावसाचा फटका काही संघांना लीग राऊंडच्या शेवटी बसू शकतो. एवढचं नाही तर भारताच्या सामन्यांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यझीलंड यांच्यात गुरुवारी नॉटिंघममध्ये सामना होणार आहे, मात्र गेल्या दोन दिवसापासून नॉटिंघममध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळं या दोन्ही संघांना सरावही करता आला नाही. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दुपारपर्यंत नॉटिंघममध्ये पावसाचटी शक्यता आहे. भारत-पाकिस्तान सामन्यालाही बसणार पावसाचा फटका वर्ल्ड कपमधला हाय वोल्टेज सामना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफोर्ड या मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी ट्रैफोर्डच्या मैदानावर पावसाची शक्यता आहे. जर रविवारी पाऊस पडला तर, चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकीटं अगदी 48 तासांत विकल्या गेल्या होत्या. आतापर्यंत सहावेळा भारत पाकिस्तान एकमेकांविरुद्ध भिडले आहेत, याच एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची ‘गब्बर’ जागा?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या