JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : विराट कोहलीची चिंता वाढली, धवननंतर आता आणखी एक खेळाडू जखमी

World Cup : विराट कोहलीची चिंता वाढली, धवननंतर आता आणखी एक खेळाडू जखमी

याआधी ऑस्ट्रेलियाविरोधात शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून :  ICC Cricket World Cup 2019मध्ये भारतीय संघ सध्या चांगल्याच जोमात आहे. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला तब्बल 89 धावांनी नमवत विराट सेनेने आपली विजयी परंपरा कायम राखली. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 7 वेळा भारतीय संघाने पाकिस्तानला पाणी पाजले आहे. भारतीय संघाने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक उडाली. पावसामुळे हा खेळ केवळ 40 षटकांचा झाला. यातही भारतीय संघाने पाकिस्तानवर तब्बल 89 धावांनी विजय मिळवला. यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ सध्या 7 गुणसह तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, विराट सेनेनं या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारत आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली असली तरी विराटला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे. यामुळे आता तोही वर्ल्ड कपला मुकणार असे चित्र दिसत आहे. भुवनेश्वर कुमारच्या उजव्या पायाच्या स्नायूंवर दबाव आल्यामुळे आपली ओव्हर सुरू असतानाच त्याला मैदान सोडावे लागले. ऑस्ट्रेलियाविरोधात भुवनेश्वरने 3 विकेट घेतल्या होत्या. त्याचा फॉर्म पाहता, विराटसाठी चिंतेचा विषय असेल. भारत आता अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश यांच्या विरोधात खेळणार आता. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने भुवनेश्वर 2-3 सामने खेळू शकणार नाही अशी माहिती दिली. तसेच, “भुवनेश्वरची दुखापत गंभीर नाही, त्यामुळे तो लवकर बरा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे”, असे कोहलीने सांगितले.

संबंधित बातम्या

कसा झाला भुवनेश्वर जखमी पाकिस्तान विरोधात गोलंदाजी करत असताना पाचव्या षटकातील 5 व्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. हे षटक दोन गोलंदाजांनी टाकले. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला 5 वे षटक करताना पायाचे स्नायू दुखावल्याने त्याला मैदान सोडावं लागलं. चार चेंडूत त्याने एकही धाव दिली नव्हती. त्यानंतर उर्वरित षटक टाकण्यासाठी विजय शंकरकडे चेंडू सोपवला. त्याने पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला बाद केलं. इमामने 7 धावा केल्या. तेव्हा पाकिस्तानच्या 13 धावा झाल्या होत्या.  भुवनेश्वर कुमारने पहिले चार चेंडू निर्धाव टाकले. चौथ्या चेंडूनंतर भुवनेश्वरला वेदना होऊ लागल्या. यावेळी धोनी आणि इतरांनी त्याच्याशी चर्चा केली. दरम्यान पंचांनी हॅमर्सना मैदानात बोलवून फूटहोल्स ठीक करून घेतली. अखेर भुवनेश्वर कुमार मैदानाबाहेर गेला. त्यानंतर विजय शंकरने षटक पूर्ण केलं.  कोणाला मिळणार संधी भारत आपला पुढचा सामना शनिवारी अफगाणिस्तान विरोधात होणार आहे. जर या सामन्यात भुवनेश्वरला खेळता आले नाही तर जलद गोलंदाज मोहमम्द शामीला संघात संधी मिळेल. शमीने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. मात्र सराव सामन्यात गोलंदाजी केली होती. रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या