कार्डिफ, 01 जून : क्रिकेटच्या महासंग्रामाला इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरुवात झाली.भारतविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने म्हटलं होतं की, बेल्स थोड्या जड असल्याने त्या गोलंदाजांसाठी अडचणीच्या ठरतात. त्याच बेल्समुळे ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरला जीवदान मिळालं 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाचे सलामीचे फलंदाज फिंच आणि वॉर्नर यांनी सावध सुरुवात केली. मात्र बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. वॉर्नर फलंदाजी करत असताना, स्टम्पला चेंडू लागला पण जिंग बेल्स न पडल्यानं वॉर्नर थोडक्यात वाचला. पहिया दहा दिवसांत पाचवेळा असं घडणं हे धक्कादायक असल्याचं मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटलं आहे.
शनिवारी झालेल्या इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातही बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बेल्स पडल्या नव्हत्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर बेन स्टोक्सने बांगलादेशच्या सैफुद्दीनचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यावेळी मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ख्रिस गेल बाद होण्यापासून वाचला होता. तेव्हाही चेंडू स्टम्पला लागल्यावर बेल्स पडल्या नव्हत्या. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात लंकेच्या करुणारत्नेला जीवदान मिळालं. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर करुणारत्नेच्या बॅटला चेंडू लागून स्टंपवर आदळला पण बेल्स पडल्याच नाहीत. यावेळी करुणारत्नेसह मैदानावरील सर्वच खेळाडू आश्चर्यचकीत झाले. वर्ल्ड़ कपच्या आधी भारतात झालेल्या आयपीएलमध्ये तीनवेळा चेंडू लागुनही बेल्स न पडल्याचा प्रकार घडला होता. आता वर्ल़्ड कपमध्ये दुसऱ्यांदा गोलंदाजांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. डावाच्या सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर करुणारत्नेच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्टंपला लागला. त्यावेळी करुणारत्ने बाद झालो असं समजून स्तब्धच झाला होता.त्यावेळी करुणारत्ने 10 धावांवर खेळत होता.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यावेळीही असाच प्रकार घडला होता. सामन्याच्या दुसऱ्या डावातील 11 व्या षटकात अदिल राशिदने टाकलेल्या चेंडूवर क्विंटन डिकॉकला जीवदान मिलाले. यावेळी स्टंपला लागून चेंडू सीमारेषेबाहेर गेला तरी बेल्स पडल्या नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डावाच्या सुरुवातीलाच मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर लंकेचा लाहिरू थिरिमाने पायचित झाला. पंचांनी पायचितचे अपिल फेटाळून लावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने डीआरएस घेतला. त्यानंतर पंचांना निर्णय बदलून लाहिरूला बाद दिले.त्यानंतर परेरा आणि करुणारत्ने यांनी 42 धावांची भागिदारी केली. 9 व्या षटकात पहिल्या चेंडूवर हेन्रीच्या गोलंदाजीवर परेरा तर दुसऱ्या चेंडूवर कुशल मेंडिस बाद झाला. यानंतर धनंजय डी सिल्वाला फर्ग्युसनने पायचित केलं. धनंजयनंतर आलेल्या मॅथ्यूजला ग्रँडहोमने लॅथमकरवी झेलबाद केलं. लंकेचा निम्मा संघ 15 षटकांत 60 धावांमध्ये तंबूत परतला. VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली ‘कविता’