साऊदम्पटन, 11 जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करलेल्या दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजयाची आवश्यकता होती. मात्र पावसाने त्यांच्या खेळावर पाणी फिरवलं. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका प्रथम फलंदाजीला उतरली पण 7.3 षटकांचाच खेळ होऊ शकला. या खेळानंतर पावसाला सुरुवात झाली. शेवची सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळं पावासामुळं का होईना दक्षिण आफ्रिकेनं आपलं खाते उघडले आहे. सध्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ एक गुणासह नवव्या स्थानी आहे, तर अफगाणिस्तानचा संघ एकही सामना न जिंकता दहाव्या स्थानावर आहे. सध्या प्रत्येक संघानं 2 सामने खेळले आहेत. तर, वेस्ट इंडिजचा संघ सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात पाक्सितानविरुद्ध विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळं वेस्ट इंडिजच्या खात्यात सध्या 3 गुण आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये राऊंड रॉबीन पध्दतीचा वापर होत असल्यानं प्रत्येक संघाचे सर्व प्रतिस्पर्धी संघाशी सामने होणार आहेत. यात पहिल्या चार क्रमांकावरचे संघ सेमीफायनलमध्ये पोहचतील. त्यामुळं भारतीय संघाला आपले सर्व चांगल्या रनरेटनं जिंकावे लागणार आहे. तसेच, इतर संघाच्या वाटचालीकडेही लक्ष ठेवावे लागणार आहे. दरम्यान, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना आता सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना रद्द झाल्याने वेस्ट इंडिजला एक तर दक्षिण आफ्रिकेला एक गुण मिळाला. वेस्ट इंडिजचे तीन सामने झाले असून एक विजय आणि एक पराभव झाला आहे. या एका गुणासह एकूण तीन गुण झालेल्या वेस्ट इंडिजने गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानला मागे टाकलं. दोन्ही संघ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर दक्षिण आफ्रिका 4 सामन्यातील तीन पराभवासह नवव्या स्थानी असून त्यांची सेमीफायनलला पोहचण्याची वाट बिकट झाली आहे. VIDEO : लंडनमध्ये मॅच पाहायला पोहोचला विजय मल्ल्या, लोकांनी केलं असं ‘स्वागत’