मुंबई, 1 जुलै : वर्ल्डकपमध्ये इंग्लड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. आता त्यावरुनही सोशल मीडियावर तर्कवितर्क लढवले जावू लागलेत. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी पराभवासाठी नव्या जर्सीला जबाबदार धरलं आहे. तर पाकचा सेमीफायनलमधील प्रवेश डळमळीत झाला आहे. त्यामुळं वकास युनूसचा चांगलाच तिळपापड झाला आहे.