लंडन, 25 जून : ICC Cricket World Cupमध्ये सध्या सर्व सामने रोमाचंक होत आहेत. कारण आता लीग स्टेजमधील सामना संपत आले असून, सेमीफायनलचा थरार सुरु होणार आहे. यात यजमानांची परिस्थिती मात्र गंभीर आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभव स्विकारलेल्या इंग्लंडचे सेमीफायनलमध्ये पोहचणे कठिण झाले आहे. आता त्यांची पुढील लढत आज ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. मात्र सलामीचा फलंदाज जेसॉन रॉय दुखापतीमुळं हा सामना खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं इंग्लंडच्या संकटात वाढ झाली आहे. दरम्यान सध्या ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सामन्यासाठी त्यांना मदत करतोय महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. इंग्लंडला आज होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे खुप महत्त्वाचे आहे. त्यामुळं सध्या संपुर्ण संघ नेट्समध्ये चांगला सराव करत आहे. यासाठी आता त्यांनी थेट सचिनच्या लेकाला म्हणजेच अर्जुन तेंडुलकरला पाचारण केले आहे. अर्जुन हा सध्या काऊंटी क्रिकेटसाठी इंग्लंडमध्ये खेळत असल्याने इंग्लंडच्या संघाने त्याला बोलावले असल्याचे सांगितले जात आहे. आता सध्या यजमान इंग्लंडचे सध्या तीन सामने उरले आहेत. पण महत्वाचे म्हणजे हे तिन्ही सामने तुल्यबळ संघाशी होणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड या तीन सघांचा समावेश आहे. त्यामुळे इंग्लंडला जर विश्वचषकातील आव्हान कायम ठेवायचे असेल, तर त्यांना दमदार कामहीरी करावी लागणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा इंग्लडचे आता तीन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अर्जुननं दिला रुटला त्रास अर्जुननं इंग्लंडच्या फलंदाजांकरिता नेटमध्ये गोलंदाजी केली. उजव्या हाताचा गोलंदाज असलेल्या अर्जुननं रुटला गोलंदाजी केली. इंग्लंडला मिशेल स्टार्क सारख्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार असल्यामुळं त्यांना एका जलद गोलंदाजाकडून सरावाची गरज होती. मात्र अर्जुननं आपल्या चेंडूनं रुटला चांगलाच त्रास दिला.
अर्जुनच्या स्पिडची इंग्लंडमध्ये चर्चा याआधी अर्जुनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. इंग्लंडमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत अर्जुन सहभागी झाला होता. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर त्याच्या संघानं सामना जिंकला होता.
यावेळी त्यानं प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला ज्या पध्दतीनं बोल्ड केले तो, त्यामुळं त्याची सर्वत्र चर्चा होती. VIDEO : भारतीय महिला हॉकी टीमचा बसमध्ये विजयी जल्लोष