बंगळुरू, 18 जुलै : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून संघातून बाहेर आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी बुमराह महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे बुमराहच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता बुमराहने स्वत:च त्याच्या फिटनेबद्दल अपडेट दिले आहेत. तो लवकरच टीम इंडियात परतण्याची शक्यता आहे. बुमराह सप्टेंबर 2022 पासून कोणताच सामना खेळलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तो उतरला नव्हता. त्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो बंगळुरूतील एनसीएमध्ये गोलंदाजी करताना दिसतो. गोलंदाजी करताना त्याच्या चेहऱ्यावर हास्यही दिसतं. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला आय एम कमिंग होम असं गाणंही सुरू आहे. लवकरच बुमराह आंतरराष्ट्रीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात आयर्लंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका होणार असून यातून तो पुनरागमन करेल अशी चर्चा आहे. शाळा, हॉस्पिटलचे पैसे स्पर्धेसाठी नाही वापरू शकत; व्हिक्टोरियाचा कॉमनवेल्थच्या आयोजनाला नकार भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहबाबत कोणतंही पाऊल घाईने उचलण्यास तयार नाही. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारा वनडे वर्ल्ड कप टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. 2011 नंतर भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकू शकलेला नाही. तसंच अनेक खेळाडू सध्या दुखापतीने त्रस्त आहेत. यात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, उमेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे.
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. डोमिनिकात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला. आता दुसरा कसोटी सामना 20 जुलै रोजी होणार आहे. यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने होणार आहेत. टी20 मधील 2 सामने अमेरिकेत होणार आहेत.