बाऊन्सर लागून कर्णधार झाला जखमी
मीरपूर, 17 जून : बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी मालिका सुरू असून मीरपूर कसोटीवर बांगलादेशने पकड मजबूत केली आहे. अफगाणिस्तानला कसोटी जिंकायची असेल तर त्यांना अखेरच्या दोन दिवसात 617 धावा कराव्या लागतील आणि त्यांच्याकडे 8 विकेट शिल्लक आहेत. दरम्यान, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला दुखापत झाली आहे. गोलंदाज टस्किन अहमदचा बाऊन्सर त्याला लागला. हेल्मेटच्या मागच्या बाजुला चेंडू जोरात आदळला. त्यानंतर त्याने मैदान सोडलं. अफगाणिस्तानच्या संघाने हशमतुल्लाहला दुखापत झाल्यानंतरही कनकशन सब्स्टीट्यूट घेतला नाही. त्याची प्रकृती जर बिघडली तर संघ दुसऱ्या दिवशी यावर विचार करू शकतो. अफगाणिस्तानच्या मेडिकल टीमचे म्हणणे आहे की, हशमतुल्लाह सध्या ठिक आहे. मैदानात त्याच्याबाबत थोडा संभ्रम होता. आम्हाला दुखापत गंभीर असल्याची शंका होती आणि खबरदारी म्हणून मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियात संधी नाही तर तरुणांची जागा का अडवू; सिनियर खेळाडू संघातून झाला बाहेर मेडिकल युनिटचे म्हणणे आहे की, आज पूर्ण दिवसभर तो देखरेखीखाली असेल. दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेऊ की त्याच्या जागी कनकशन सब्स्टीट्यूट घ्यायचा की नाही. सुरुवातीच्या क्षणांमध्ये त्याला काही सांगता येत नव्हतं पण आता तो ठीक आहे. आम्ही पुढचे 48 तास वाट पाहू. तो उद्या फलंदाजीला उतरू शकेल की नाही याचा अंदाज आम्हाला येईल. हशमतुल्लाह दुसऱ्या डावात 13 धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. याआधी पहिल्या डावात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. त्यात हशमतुल्लाहला फक्त 9 धावा करता आल्या होत्या.