मुंबई, 1 जानेवारी : भारताचा ऑलराउंडर हार्दिक पांड्याने (hardik pandya) अखेर आपल्या रिलेशनशिपबद्दल जाहिररीत्या कबुली दिली आणि ‘Engaged’ असल्याचं रोमँटिक पद्धतीने जाहीर केलं. नताशा स्टानकोविचबरोबरचा (natasha stankovic) आपले फोटोसुद्धा हार्दिकने शेअर केले आहेत. हार्दिक आणि नताशा या दोघांचा बोटीवरचा रोमँटिक VIDEO आता व्हायरल होतो आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टानकोविच यांच्या नात्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती. अखेर हार्दिक पांड्याने सर्व अफवा आणि चर्चा थांबवत नातं जाहीर केलं आहे. नव्या वर्षाच्या आधी हार्दिक पांड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला होता. पण 1 तारखेला संध्याकाळी त्याने आणखी काही फोटो शेअर करत आपली कमिटमेंट सिद्ध केली. Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ❤️ #engaged असं लिहित त्यानं फोटो शेअर केले आहेत. रोमँटिक गाण्याच्या सुरात दोघं नाचताना दिसत आहेत. हार्दिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नताशा आणि हार्दिक नवीन वर्षाची सुरुवात अशा रोमँटिक अंदाजात करताना दिसले.
पांड्याने सकाळी शेअर केलेल्या फोटोसोबत एक कॅप्शन दिली. त्यात म्हटलं होतं की, नव्या वर्षाची सुरुवात माझ्या ‘फायरवर्क’सोबत. यासोबत त्याने लव्हचा इमोजीसुद्धा शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर भारताच्या क्रिकेटपटूंसह पांड्याच्या मित्र-मैत्रीणींनी कमेंट केल्या. त्यानंतर संध्याकाळी हार्दिक हार्दिकने आणखी काही फोटो शेअर केले. नताशानेही आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरून काही व्हिडिओ शेअर केले आहेत.