मुंबई, 26 एप्रिल : आय़पीएलमध्ये मंगळवारी गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 55 धावांनी हरवलं. यासह हार्दिक पांड्या आय़पीएलच्या इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. यासोबतच हार्दिक पांड्याने एमएस धोनीचा विक्रमही मोडला आहे. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विजयाची टक्केवारी असणारा कर्णधार बनला आहे. हार्दिक पांड्या 21व्यांदा गुजरात टायटन्सचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला 16 वा विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासात त्याच्या नेतृत्वाखाली फक्त पाच सामने संघाने गमावले आहेत. त्यामुळे त्याची विजयाची टक्केवारी 76.1 टक्के इतकी आहे. कोणत्याही कर्णधाराने आयपीएलमध्ये 20 किंवा त्याहून जास्त सामन्यात नेतृत्व केलं आहे त्यामध्ये हार्दिक पांड्या विजयाच्या टक्केवारीनुसार सर्वात आघाडीवर आहे. तर महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. IPL 2023 MI vs GT : गुजरातच्या मैदानावर मुंबईचा लाजिरवाणा पराभव, गुजरातने नोंदवला पाचवा विजय एमएस धोनीची विजयाची टक्केवारी 58.99 इतकी आहे. त्याने 217 सामन्यात नेतृत्व केलं असून त्यापैकी 128 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे. धोनीनंतर सचिन तेंडुलकरचा नंबर लागतो. मुंबई इंडियन्सचं 51 वेळा नेतृत्व करताना संघ 30 सामन्यात जिंकला. त्याची विजयाची टक्केवारी 58.82 टक्के इतकी आहे. तर स्टिव्ह स्मिथ चौथ्या, अनिल कुंबळे पाचव्या, ऋषभ पंत सहाव्या, शेन वॉर्न सातव्या, रोहित शर्मा आठव्या, गौतम गंभीर नवव्या तर सेहवाग दहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, गुजरातविरुद्ध मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातकडून शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा हे दोघे मैदानात उतरले. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने 56, हार्दिक पांड्या 13, विजय शंकर 19, डेविड मिलर 46, अभिनव मनोहरने 42 तर राहुल तेवाटियाने 20 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावलाने 2 विकेट्स तर अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. गुजरात टायटन्सने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स देऊन 207 धावा केल्या तर मुंबईला विजयासाठी 208 धावांचे आव्हान दिले. मुंबई इंडियन्सकडून ईशान शर्माने 13, कॅमेरन ग्रीनने ३३, सूर्यकुमार यादवने 23, नेहाला वधेराने 40, पीयूष चावलाने 18 तर अर्जुन तेंडुलकरने 13धावा केल्या. उर्वरित कोणत्याही फलंदाजाला मुंबईसाठी दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.