JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'तर हे सरप्राईज... डॅडी तुमची खूप आठवण येतेय', टीम इंडियाचा ऑलराऊंडर इमोशनल, VIDEO

'तर हे सरप्राईज... डॅडी तुमची खूप आठवण येतेय', टीम इंडियाचा ऑलराऊंडर इमोशनल, VIDEO

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (Indian Premier League 2022) नवीन टीम गुजरात टायटन्सचं (Gujarat Titans) नेतृत्व करेल. गुजरात टायटन्सने हार्दिकला 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 फेब्रुवारी : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएलच्या 15 व्या मोसमात (Indian Premier League 2022) नवीन टीम गुजरात टायटन्सचं (Gujarat Titans) नेतृत्व करेल. गुजरात टायटन्सने हार्दिकला 15 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) में दरम्यान अखेरचा क्रिकेटच्या मैदानात दिसला होता, त्यानंतर तो टीमबाहेर आहे. मागच्या काही काळापासून हार्दिकला बॉलिंग करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात हार्दिकने बॉलिंग केली नव्हती. तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याला फक्त दोनच ओव्हर बॉलिंग करता आली होती, त्यामुळे आयपीएलच्या आगामी मोसमात हार्दिक बॉलिंग करणार का नाही, याबाबत प्रश्न आहे. 28 वर्षांच्या हार्दिकने शुक्रवारी सोशल मीडियावर एक इमोशनल व्हिडिओ शेयर केला. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून हार्दिकने त्याच्या दिवंगत वडिलांसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अकेले हम अकेले तुम… हे गाणं या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला वाजत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक रात्रीच्या वेळी वडिलांच्या खोलीमध्ये जातो, तिथले लाईट लावतो आणि त्यांना सरप्राईज देतो. तसंच हार्दिकचे वडीलही त्याला मिठी मारतात. हे सरप्राईज तुमच्याकडून मला पुन्हा मिळू शकलं असतं तर.. मिस यू डॅडी, असं कॅप्शन हार्दिकने या व्हिडिओला दिलं आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात हार्दिकच्या वडिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं होतं.

संबंधित बातम्या

आयपीएलमध्ये हार्दिक खेळला 92 मॅच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा खेळाडू राहिलेल्या हार्दिकला टीमने आयपीएल 2022 आधी रिलीज केलं. हार्दिकने आयपीएलमध्ये 92 मॅच खेळल्या, यात त्याने 155 च्या स्ट्राईक रेटने 1476 रन केले, तसंच त्याने 42 विकेटही घेतल्या. भारताकडून हार्दिकने 11 टेस्ट, 63 वनडे आणि 54 टी-20 मॅच खेळल्या. टेस्टमध्ये हार्दिकच्या नावावर 532 रन आहेत, तर वनडेमध्ये त्याने 1286 रन केले. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये हार्दिकच्या नावावर 553 रन आहेत. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिक मागच्या दोन वर्षांपासून फिटनेसच्या समस्येने ग्रासला आहे. सध्या तो रिहॅबच्या प्रक्रियेतून जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या