JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टीम इंडियाचा कॅप्टन झालो नाही कारण... हरभजनचे 'सरकार'वर गंभीर आरोप

टीम इंडियाचा कॅप्टन झालो नाही कारण... हरभजनचे 'सरकार'वर गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला आहे. टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डामध्ये शिफारसीची गरज असते. बीसीसीआयमध्ये मी कोणालाच ओळखायचो नाही, त्यामुळे मला कधी टीमचा कर्णधार करण्यात आलं नाही, असा आरोप हरभजनने केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) बीसीसीआयवर (BCCI) निशाणा साधला आहे. टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डामध्ये शिफारसीची गरज असते. बीसीसीआयमध्ये मी कोणालाच ओळखायचो नाही, त्यामुळे मला कधी टीमचा कर्णधार करण्यात आलं नाही, असा आरोप हरभजनने केला. हरभजन सिंगने मागच्या वर्षी 24 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. न्यूज 18 सोबत बोलताना हरभजनने बीसीसीआय आणि धोनीसोबतच्या (MS Dhoni) नात्यावरही भाष्य केलं. जर बोर्डामध्ये तुम्ही एखाद्या पॉवरफूल सदस्याचे फेवरेट नसाल, तर तुम्हाला सन्मान मिळत नाही, पण आता याबद्दल आता बोलू नकोया. भारताची कॅप्टन्सी करण्यात आपण सक्षम होतो, कारण आम्ही बऱ्याच कर्णधारांना मार्गदर्शन केलं. मी भारताचा कर्णधार झालो का नाही, हे फार महत्त्वाचं नाही. याचा मला अजिबात पश्चाताप नाही. खेळाडू म्हणून मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, असं हरभजन म्हणाला. BCCI म्हणजे सरकार, धोनीबाबत तक्रार नाही या मुलाखतीमध्ये हरभजनला धोनीसोबतच्या नात्याबाबतही विचारण्यात आलं. तेव्हा मला धोनीबाबत कोणतीही तक्रार नाही. तो इतकी वर्ष माझा चांगला मित्र आहे, पण माझी तक्रार तेव्हाच्या बीसीसीआय सरकारबद्दल आहे. मी बीसीसीआयला सरकार म्हणतो. त्यावेळच्या निवड समितीने आपल्या भूमिकेसोबत न्याय केला नाही, त्यांनी टीमला एकजूट होऊन दिलं नाही, असा आरोप हरभजनने केला आहे. ‘2012 मध्ये खूप गोष्टी चांगल्या होऊ शकल्या असत्या. माझ्याशिवाय वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर भारतीय टीमसाठी खेळून निवृत्ती घेऊ शकत होते, कारण आम्ही सगळे आयपीएल खेळत होतो. 2011 सालची चॅम्पियन टीम पुन्हा कधीच एकत्र खेळली नाही, हे समजण्या पलीकडचं आहे. त्या टीममधले फक्त काहीच खेळाडू 2015 वर्ल्ड कप का खेळले?,’ असा सवाल हरभजनने विचारला. करियरमध्ये अनेकवेळा तुला कुंबळेपेक्षा प्राधान्य दिलं जायचं, तरीही कधी वाद झाले नाहीत, असा प्रश्न हरभजनला विचारण्यात आला. यावर बोलताना हरभजन म्हणाला, ‘अनिल कुंबळेबद्दल माझ्या मनात सन्मान आहे, त्याच्यापेक्षा मोठा मॅच विनर झालेला नाही. त्याच्यासोबत खेळणं माझं भाग्य होतं. अनेकवेळा त्याच्याऐवजी मला प्लेयिंग इलेव्हनमध्ये निवडण्यात आलं. 2003 वर्ल्ड कपमध्ये असं अनेकवेळा झालं. पण कधीही याबद्दल त्याच्या मनात काही अडचण मला दिसली नाही. मी कुंबळेच्या सावलीइतकाही चांगला होऊ शकत नाही.’ हरभजनच्या नेतृत्वात मुंबई पहिल्यांदा चॅम्पियन हरभजन सिंगला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं नसलं तरी तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. 2011 साली मुंबईने हरभजनच्याच नेतृत्वात आरसीबीचा पराभव करत चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत विजय मिळवला. आयपीएलमध्ये हरभजनने 20 मॅचमध्ये नेतृत्व केलं, यातल्या 10 मध्ये टीमला विजय आणि 10 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. हरभजन सिंग भारतासाठी 103 टेस्ट खेळला, यात त्याने 417 विकेट घेतल्या, तर 236 वनडेमध्ये त्याने 269 विकेट मिळवल्या. टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 28 सामन्यांमध्ये त्याला 25 विकेट मिळाल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या