JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'मसाला डोसा'ची ऑर्डर देणाऱ्या ट्रोलरची हनुमा विहारीने केली बोलती बंद! म्हणाला...

'मसाला डोसा'ची ऑर्डर देणाऱ्या ट्रोलरची हनुमा विहारीने केली बोलती बंद! म्हणाला...

भारतीय टेस्ट टीमचा खेळाडू हनुमा विहारी (Hanuma Vihari) कोरोना महामारीच्या संकटात अनेकांची मदत करत आहे. हनुमा विहारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज शेयर करून मदतीशिवाय फंडही गोळा करत आहे, ज्यामुळे गरजूंचा फायदा होईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : भारतीय टेस्ट टीमचा खेळाडू हनुमा विहारी (Hanuma Vihari) कोरोना महामारीच्या संकटात अनेकांची मदत करत आहे. हनुमा विहारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज शेयर करून मदतीशिवाय फंडही गोळा करत आहे, ज्यामुळे गरजूंचा फायदा होईल. फक्त हनुमा विहारीच नाही, तर इतर क्रिकेटपटूही या कठीण काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पण तरीही सोशल मीडियावर क्रिकेटपटूंवर निशाणा साधला जात आहे, त्यांच्याविषयी खराब भाषेचा वापर केला जातोय. एका ट्रोलरने हनुमा विहारीसोबत गैरवर्तन केलं. यानंतर विहारीनेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्याची बोलती बंद केली. ‘ठीक आहे, दोन मसाला डोसा घेऊन ये आणि नारळाची चटणी पण आण,’ अशी कमेंट त्याने केली. यावर हनुमा विहारीने प्रत्युत्तर दिलं. मी तुझी मदत नक्कीच केली असती, जर तू इतर लोकांप्रमाणे गरजू असतास. पण तुला तर वेगळ्या आजाराने ग्रासलं आहे, असं विहारी म्हणाला. यामध्ये मी तुझी मदत करू शकत नाही, मला माफ कर, अशी कमेंटही विहारीने केली. त्याची ही कमेंट वाचून ट्रोलरने त्याचं ट्विटर अकाऊंटच बंद केलं. चाहत्यांनीही या ट्रोलरला चांगलंच सुनावलं. टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू मागच्या काही दिवसांमध्ये आयपीएल (IPL 2021) खेळत होते, पण टेस्ट स्पेशलिस्ट हनुमा विहारीला कोणत्याही टीमने विकत घेतलं नाही. त्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. वारविकशायर आणि हनुमा विहारी यांच्यात करारही झाला, पण तिन्ही सामन्यांमध्ये विहारी अपयशी ठरला. या 3 सामन्यांमध्ये त्याला एकच अर्धशतक करता आलं. हनुमा विहारीने 3 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 17 च्या सरासरीने 100 रन केले, यात तो दोनवेळा शून्य रनवर आऊट झाला. ऑफ स्पिनर असलेल्या विहारीला एक ओव्हर बॉलिंग करण्याचीही संधी मिळाली. विहारीचा हा फॉर्म बघता त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळणं कठीण दिसत आहे. वारविकशायरसोबत हनुमा विहारीचा फक्त 3 मॅचचाच करार होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या