JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह, 3 दिवसांपासून प्रकृती बिघडली

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह, 3 दिवसांपासून प्रकृती बिघडली

तीन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली आहे. टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 13 जून : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. भारत, अमेरिका या देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याशिवाय पाकिस्तानवरही कोरोनाचं संकट आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीलाही कोरोनाव्हायरसचा फटका बसला आहे. त्यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. गुरुवारपासून त्याची तब्येत बिघडली होती, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून आफ्रिदी पाकिस्तानमधील गरीब आणि गरजू लोकांना सतत मदत करीत होते. ते आपल्या टीमसह पाकिस्तानच्या विविध भागात दैंनदिन जीवनासाठी आवश्यक साहित्य पुरवित होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती पुरवली आहे.

व्यक्त केली वेदना शाहिद आफ्रिदीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘गुरुवारपासून माझी तब्येत ठीक नव्हती. माझं शरीरात खूप वेदना होत होत्या. त्यानंतर मी कोरोना टेस्ट केली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  मी लवकरात लवकर यातून बरा होवो यासाठी तुम्ही सर्वजण माझ्यासाठी प्रार्थना करा. हे वाचा- नायब तहसीलदार शिवांगी खरे यांनी ड्रायव्हरकडून चप्पलही करुन घेतली सॅनिटाईज शिर्डीत दगडाने ठेचून हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या