JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ क्रिकेटर; ब्रेन ट्यूमरमुळे ICUमध्ये दाखल

मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ क्रिकेटर; ब्रेन ट्यूमरमुळे ICUमध्ये दाखल

बांगलादेशचा क्रिकेटपटू मोशरफ हुसेन रूबेल(Former cricketer Mosharraf Rubel) हा ब्रेन ट्यूमरशी झुंज देत आहे, त्यामुळे त्याला ढाका येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात

मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ क्रिकेटर; ब्रेन ट्यूमरमुळे आयसीयूमध्ये दाखल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: बांगलादेश क्रिकेट संघातून (Bangladesh cricket team)एक वाईट बातमी समोर आली आहे. लेफ्ट ऑर्म स्पिनर रूबेल हा ब्रेन ट्यूमरशी झुंज(Former cricketer Mosharraf Rubel in ICU with brain tumor) देत आहे, त्यामुळे त्याला ढाका येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. रूबेल 2019 पासून ब्रेन ट्यूमरशी झुंज देत आहे. मोशर्रफ हुसेन रूबेल यांच्या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, बुधवारी (14 ऑक्टोबर) त्याची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. रूबेल याची रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समोर आल्यापासून चाहते त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.

बांगलादेशाचा माजी कर्णधार मशरफे बिन मुर्तझा याने त्याच्या फेसबुक पेजवर भावुक पोस्ट लिहीत प्रार्थना केली आहे. ‘माझा मित्र रुबेल, मी तुझ्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हाव्यात यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करतो. तुला मैदानात परतण्याची गरज नाही, तू फक्त तुझ्या कुटुंबाकडे परत ये.’ असे मुर्तझा याने पोस्टमध्ये म्हटले आहे. मोशरफ हुसेन रुबेलने 9 मार्च 2008 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 7ऑक्टोबर 2016 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या गोलंदाजाने 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 4 विकेट्स घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 392 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3305 धावाही केल्या आहेत. यात त्याने दोन शतके आणि 16 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय 56 देशांतर्गत टी20 सामन्यात 60 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 104 लिस्ट ए सामने खेळले आहेत त्यात त्याने 120 विकेट्स घेतल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या