JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मेस्सीने ऑर्डर केले सोन्याचे 35 iPhone, वर्ल्ड चॅम्पियन्सना देणार गिफ्ट; वाचा काय आहे खास?

मेस्सीने ऑर्डर केले सोन्याचे 35 iPhone, वर्ल्ड चॅम्पियन्सना देणार गिफ्ट; वाचा काय आहे खास?

आयफोनवर प्रत्येक खेळाडुचे नाव आणि अर्जेंटिनाचा लोगो छापण्यात आला आहे. खेळाडुच्या नावासोबतच त्यांचा जर्सी नंबरही त्यावर आहे.

जाहिरात

messi

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ब्युनोस आयर्स, 02 मार्च : अर्जेंटिनाला फिफा वर्ल्ड कप २०२२ जिंकून देणारा कर्णधार लिओनेल मेस्सीने त्याच्या चॅम्पियन संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला स्पेशल गिफ्ट देणार आहे. यासाठी त्याने ३५ सोन्याचे आयफोन ऑर्डर केले आहेत. पर्सनलाइज्ड असलेले हे आयफोन सोन्याने मढवलेले आहेत. ३५ आयफोन मेस्सीच्या पॅरीसमधील निवासस्थानी पोहोचवण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर मेस्सी भावुक झाला होता. दोन दशकांहून अधिक काळ देशाचं प्रतिनिधित्व करताना मेस्सीला कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करता आलं होतं. ‘ऑस्ट्रेलियासमोर फक्त 76 धावांचे आव्हान, तरी टीम इंडियाला विजयाची संधी’   मेस्सी वर्ल्ड कप विजयानंतर इतका खूश आहे की त्याने विजयी संघाचा भाग असलेल्या लोकांना स्पेशल गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार मेस्सीने ३५ सोन्याचे आयफोन खरेदी केले आहेत. या सर्वांची किंमत मिळून १.७३ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येतंय. लिओनेल मेस्सी त्याचा अभिमानास्पद असा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी काही तरी करू इच्छित होता. पण घड्याळांसारखे गिफ्ट द्यायचे नव्हते. त्यामुळे वेगळं आणि खास असं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला होता. आयफोनवर प्रत्येक खेळाडुचे नाव आणि अर्जेंटिनाचा लोगो छापण्यात आला आहे. खेळाडुच्या नावासोबतच त्यांचा जर्सी नंबरही त्यावर आहे. तसंच सर्व आयफोनवर वर्ल्ड चॅम्पियन असंही लिहिलं आहे. खास अशा आयफोनचं डिझाइन iDesign ने केलं आहे. iDesignच्या सीईओंनी मेस्सीचे कौतुक करताना म्हटलं की, तो एका चांगल्या ग्राहकांपैकी एक आहे. मेस्सीने वर्ल्ड कप फायनलनंतर काही महिन्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या