FIFA World Cup 2018 : टोनी क्रूसच्या गोलच्या बळावर जर्मनीचा स्वीडनवर 2-1 ने विजय

टोनी क्रूसच्या गोलने जर्मनीने स्वीडनवर 2-1 असा विजय मिळवलाय. शनिवारी रशियाच्या सोचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे जर्मनीची अंतिम 16 मध्ये पोहचण्याची आशा अजूनही बळावलीये.

Sonali Deshpande
माॅस्को, 24 जून : टोनी क्रूसच्या गोलने जर्मनीने स्वीडनवर 2-1 असा विजय मिळवलाय. शनिवारी रशियाच्या सोचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे जर्मनीची अंतिम 16 मध्ये पोहचण्याची आशा अजूनही बळावलीये. सामन्यात क्रूसने फ्री किकवर गोल करत चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या संघासाठी महत्त्वपूर्ण तीन गुणांची कमाई केली.स्वीडनला ३२ व्या मिनिटाला ओला तोइवोनेन याच्या गोलच्या मदतीने फायदा झाला. मिडफील्डमध्ये टोनी क्रूसने चेंडूवरील नियंत्रण गमावले आणि स्वीडिश संघाने याचा फायदा घेत जर्मन संघाला धक्का दिला.सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. पण दोन्ही संघांच्या बचावफळ्या भक्कम असल्यामुळे कोणताही संघ गोल करू शकला नाही. ३२व्या मिनिटाला स्वीडनच्या ओला टोईवोनेने केलेल्या एका चालीवर त्याला सुवर्णसंधी मिळाली. दोन्ही खेळाडूंना चकवत त्याने चेंडू गोलजवळ नेला. तो जवळ आलेला पाहून जर्मनीचा खेळाडू चार पावले पुढे आला. त्याचा फायदा घेऊन ओला टोईवोनेनने चेंडू जर्मनीच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून अलगद गोलपोस्टमध्ये टाकून आपल्या संघाला १ गोलची आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या हाफमध्ये गतविजेत्या जर्मनीने आपला खेळ उंचावला.

सामन्यात शानदार पुनरागमन करत गतविजेत्या जर्मनीने 1-2ने विजय मिळवत राऊंड -16 मध्ये राहण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

Trending Now