JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / असं कोण आऊट देतं? पंचांनी केलेल्या चुकीचा हा VIDEO पाहून डोक्यावर हात माराल

असं कोण आऊट देतं? पंचांनी केलेल्या चुकीचा हा VIDEO पाहून डोक्यावर हात माराल

एवढी मोठी चुक तीही पंचांकडून, अशा अजब विकेटचा VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 17 जुलै : कोरोनामुळे भारतातील क्रिकेट सामने रद्द झाले असले तरी, इंग्लंडमध्ये क्रिकेट सामने सुरू झाले आहेत. एकीकडे इंग्लंड-वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाल्यामुळं क्रिकेट चाहत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यातच आता युरोपियन क्रिकेट लीगलाही (European Cricket League) सुरूवात झाली आहे. युरोपात क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. मात्र हा स्पर्धेत अजब प्रकार घडला. युरोपियन क्रिकेट लीगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये पंचांनी ज्या पद्धतीने फलंदाजाला बाद केले, ते पाहून आश्चर्य वाटेल. गोलंदाज आणि अन्य खेळाडूंनी फलंदाज बाद असल्याचे अपील केले. पंचांनी वेळ न दवडता, लगेचच फलंदाजाला बाद निर्णय घोषित केले. वाचा- चेंडू व्हाइड समजून फलंदाजानं सोडला, तरी झाला बोल्ड! मजेदार विकेटचा VIDEO VIRAL

संबंधित बातम्या

वाचा- टेस्ट मॅच की टी-20? बेन स्टोक्सचा हा षटकार पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फलंदाज खरतर बाद नव्हताच. कारण बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला होता. तरी पंचानी फलंदाजाला एलबीडब्लू आऊट घोषित केले. फलंदाजानं बाद झाल्यानंतर नाराजी व्यक्त केली, मात्र पंचांनी आपला निर्णय बदलला नाही. मात्र रिल्प्लेमध्ये जेव्हा पंचांनी केलेली चूक दिसून आली, तेव्हा मात्र सगळ्यांना हसू अनावर झाले. या विकेटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही चाहत्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. तर काहींनी असं क्रिकेट कोण खेळत? असा सवाल पंचांनाच विचारला आहे. वाचा- फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला अन् झाला बोल्ड! असा VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल संपादन - प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या