मॅंचेस्टर, 17 जुलै : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (Eng Vs WI) यांच्यात दुसरा कसोटी सामना मॅंचेस्टरमध्ये खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर इंग्लंडसाठी ही मालिका करो वा मरोची असणार आहे. मात्र या सामन्यात इंग्लंडला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या 31 ओव्हरमध्ये इंग्लंडने आघाडीचे फलंदाज गमावले. मात्र त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) फलंदाजीची धुरा सांभाळली. स्टोक्सनं डोम सिबलेसह (Dom Sibley)पहिल्या दिवशी 126 धावांची भागीदारी करत संघाला 207 धावा करून दिल्या. मात्र, या सामन्यात कर्णधार बेन स्टोक्सचे वेगळेच रुप पाहायला मिळाले. स्टोक्सने टेस्टमध्येही टी-20 स्टाइलने बॅटिंग करण्यास सुरुवात केली. फलंदाजीला येताच स्टोक्सने तुफान फटकेबाजी सुरू केली. रोस्टन चेजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन स्टोक्सने जबरदस्त षटकार लगावला. या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंग्लंड संघाच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून शेअर करण्यात आला आहे. वाचा- फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला अन् झाला बोल्ड! असा VIDEO तुम्ही कधीच पाहिला नसेल
वाचा- सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकावा लागणार आहे. पहिल्या दिवशाच्या अंती सिबलेने 253 चेंडूत 86 धावा केल्या, यात 4 चौकारांचा समावेश होता. तर, ,स्टोक्सने 159 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 59 धावा केल्या. जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात राहण्याचे प्रोटोकॉल तोडल्यामुळे इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरशिवाय खेळत आहे. आर्चर पहिल्या सामन्यानंतर साऊथॅम्प्टनहून मॅनचेस्टरला येताना ब्राइटनमधील त्याच्या घरी गेला होता. त्यामुळे त्याला वगळण्यात आले आहे. वाचा- क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन