साउथहँप्टन, 09 जुलै : कोरोनामुळं (Coronavirus) सर्व क्रिकेट सामने रद्द झाले असताना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England Vs West Indies) यांच्यात अखेर 117 दिवसांनी कसोटी सामन्याला सुरुवात झाली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. यातील पहिला सामना बुधवारी साउथहँप्टन (Southampton) येथे सुरू झाला. पावसामुळे सामना उशीरा सुरू झाला. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा दबदबा दिसून आला. एकही धाव न काढला डोमिनिक सिबली (Dom Sibley) बाद झाला. शॅनन गॅबरियननं (Shannon Gabriel) सिबलीला बाद केले. या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- सामना सुरू होण्याआधीच इंग्लंड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी टेकले गुडघे वेस्ट इंडिजचा गोलंदाज शॅनन गोलंदाजीसाठी आला होता, तेव्हा त्याचा चेंडूपुढे फलंदाजाला काहीच कळत नव्हते. सिबलीला शॅनने जबरदस्त इनस्विंग बॉल टाकला, ज्यावर काही समजण्याआधीच सिबली बाद झाला. चेंडू लेफ्ट करण्याच्या नादात सिबली बोल्ड झाला. बाद झाल्यानंतर सिबलीला दोन क्षण काही कळलेच नाही. तो आश्चर्यचकित होऊन विकेटकडे पाहत राहिला.
मुख्य म्हणजे या सामन्यात पहिल्यांदाच इंग्लंडचे कर्णधारपद बेन स्टोक्सकडे आहे. हा सामना प्रेक्षकांशिवाय खेळला जाणार आहे. कोरोनाकाळात कोणताही धोका होऊ नये, यासाठी स्टेडियमवर ठिकठिकाणी सॅनिटायझरही ठेवण्यात आले आहे. वाचा- कोरोनाच्या संकटात आजपासून सुरू होणार पहिला क्रिकेट सामना, असे असतील 10 नियम सामन्याआधी खेळाडूंनी गुडघे टेकले सामना सुरू होण्याआधीच इंग्लड-वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची गुडघे टेकले. याचे कारण म्हणजे अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीचा झालेला मृत्यू. यानंतर जगभरात ब्लॅक लाईफ मॅटर (Black Lives Matter) मोहिमेस सुरुवात झाली. याच मोहिमेला इंग्लड-न्यूझीलंडच्या खेळाडूंनी समर्थन दर्शवत सामना सुरू होण्याआधी एक हात वर करत गुडघे टेकवले.