JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / इंग्लंडचा एकाच दिवशी झाला 3 मोठ्या मॅचमध्ये पराभव, टीम इंडियानंही दिला धक्का

इंग्लंडचा एकाच दिवशी झाला 3 मोठ्या मॅचमध्ये पराभव, टीम इंडियानंही दिला धक्का

इटलीनं युरो कप फायनलमध्ये (Euro 2020) इंग्लंडचा पराभव करत त्यांची 55 वर्षांची प्रतीक्षा आणखी लांबवली आहे. इंग्लंडच्या फॅन्सना रविवारी फक्त फुटबॉलमध्ये नाही तर तीन मोठ्या मॅचमध्ये निराशा सहन करावी लागली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 12 जुलै: इटलीनं युरो कप फायनलमध्ये (Euro 2020)  इंग्लंडचा पराभव करत त्यांची 55 वर्षांची प्रतीक्षा आणखी लांबवली आहे. इंग्लंडनं गेल्या 55 वर्षात फुटबॉलची एकही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यांचा घरच्या मैदानात 2-3असा पराभव झाला. या पराभवानंतर इंग्लंडचे फॅन्स चांगलेच संतापले होते. काही ठिकाणी ते चांगलेच आक्रमक झाले होते. इंग्लंडच्या फॅन्सना रविवारी फक्त फुटबॉलमध्ये नाही तर तीन मोठ्या मॅचमध्ये निराशा सहन करावी लागली. विम्बल्डन: युरो कप फायनलच्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंना विम्बल्डन स्पर्धेत मिक्स डबल्स स्पर्धेत ुपराभव सहन करावा लागला. नील स्कूपस्कली आणि त्याची अमेरिकन जोडीदार देसीरा क्राज्विक यांनी इंग्लंडच्या जोए सॅलिसबिरी आणि हॅरियट टार्ट या जोडीचा 6-2, 6-7 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. टीम इंडियाकडून पराभव : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय महिला टीमचा (India Women vs England Women) 8 रनने रोमांचक विजय झाला आहे. भारताने ठेवलेल्या 149 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 140 रनच करता आल्या. 14 ओव्हरमध्ये 106/2 अशी इंग्लंडची अवस्था होती, पण 20 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोअर 140/8 एवढाच झाला. ENG vs PAK : आफ्रिदीचा जावई Flying Kiss जास्त देतो, शोएब अख्तर संतापला तीन मॅचच्या या सीरिजमध्ये भारत 1-0 ने पिछाडीवर होता, त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. आता सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. भारताकडून पूनम यादवने (Poonam Yadav) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर अरुंधती रेड्डी आणि दीप्ती शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. टीम इंडियाने या सामन्यात तब्बल 4 रन आऊट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या