नवी दिल्ली, 09 मे : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) ने दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये त्यांनी लेग स्पिनर आदिल राशिदनं भारताचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना कसं आऊट केलं होतं ते दाखवलं आहे. ईसीबीने 2018 च्या मालिकेतील व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये राशिदनं कोहलीचा त्रिफळा उडवला होता. यानंतर कोहलीही चकीत झाला होता. ईसीबीने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करून विचारलं आहे की, विराट तुझ्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू होता का?
फक्त विराट कोहलीचा व्हिडिओ पोस्ट करून ईसीबी थांबले नाही तर त्यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात केएल राहुल आहे. राशिद राहुलची विकेट घेताना दिसतो. त्यावेळी केएल राहुल 149 धावांवर खेळत होता. ईसीबीने या व्हिडिओसोबत म्हटलं की, राशिदची आवडती विकेट.
विराट त्या सामन्यात 71 धावांवर बाद झाला होता. त्यानं शतक केलं असतं तर ते 36 वं शतक ठरलं असतं. मात्र राशिदनं त्याला बाद करून शतकापासून दूर ठेवलं. त्याआधीच्या तीन सामन्यात कोहलीने फिरकीपटूच्या गोलंदाजीवर विकेट गमावली होती. याआधी 2014 मध्ये लंकेविरुद्ध सलग तीन सामन्यात फिरकीवर विराट बाद झाला होता. पाहा VIDEO:लॉकडाऊनमध्ये बदलला धोनीचा लुक,चेहरामोहरा इतका बदलला की चाहतेही नाही ओळखणार