JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / टी 20 वर्ल्डकपमधील धडाकेबाज खेळीचा David Warner ला मोठा फायदा

टी 20 वर्ल्डकपमधील धडाकेबाज खेळीचा David Warner ला मोठा फायदा

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर डेव्हिड वॉर्नरला (David Warner) नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

जाहिरात

David Warner

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: दोन महिन्यापूर्वी पार पडलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup)ऑस्ट्रेलियन टीमचा बोलबाला आणि दबदब दिसून आला. फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला मात देत, वर्ल्डकपवर आपल्या देशाचे नाव कोरले. मात्र, क्रिकेट जगतात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे धडाकेबाज ओपनर डेव्हिड वॉर्नरची(David Warner). नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट खेळाडू म्हणून वॉर्नरची निवड करण्यात (ICC player of the month for November)आली आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज ओपनर डेव्हिड वॉर्नरला नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. त्याने टी-20 वर्ल्डकपमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे. त्याने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत 10 सिक्स आणि 32 चौकार ठोकत 289 धावा फटकावल्या आहेत. त्याने हा किताब मिळवत न्यूझीलंडचा गोलंदाज टीम सौदी आणि आबिद अलीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलिया टीमसाठी या स्पर्धेत सर्वात महत्वाचा खेळाडू ठरला तो म्हणजे डेव्हिड वॉर्नर. त्याला जगातील स्फोटक फलंदाजापैकी एक मानले जाते.

वर्ल्डकपपूर्वी वॉर्नरला खराब परिस्थितीतून जावे लागले

वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी, आयपीएल खेळवण्यात आली होती. त्यावेळी वॉर्नर सर्वांच्या निशाण्यावर होता. आयपीएलमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या वॉर्नरला सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले होते. त्याला टीममध्ये जागा मिळणेही कठीण झाले होते. त्याआधी मात्र वॉर्नरची कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. त्याने आयपीएलच्या सीझमध्ये सर्वात जास्त धावा ठोकत हैदराबादला विजेतेपदही जिंकून दिले आहे. मात्र यंदाचा त्याचा सीझन सुमार गेला होता. महिला क्रिकेटरमध्ये वेस्ट इंडिजची ऑलाऊंडर हेली मैथ्यूजची निवड बेस्ट क्रिकेटर म्हणून झाली आहे. तिने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच तिला हा सन्मान मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या