मुंबई, 26 मे: झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रेयान बर्ल (Ryan Burl) याने त्याच्या फाटक्या बुटांचा फोटो शेयर केला होता. हा फोटो शेअर करत स्पॉन्सर नसल्याचं दु:खही त्याने बोलून दाखवलं. यानंतर काही तासांमध्येच त्याला मदत मिळाली. प्युमा (PUMA) कंपनीने बर्ल याला स्पॉन्सर करण्याचं आश्वासन दिले. ट्विट केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत स्पॉन्सर मिळाल्याने बर्ल आनंदात आहे. मात्र आता तो या ट्विटमुळे संकटात येण्याची शक्यता आहे. बर्लने सोशल मीडियावर स्पॉनरशिपसाठी केलेली तक्रार झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाच्या काही सदस्यांना आवडलेले नाही. त्यामुळे क्रिकेट बोर्ड त्याच्यावर कारवाई करण्याच्या विचारात आहे. बर्लच्या या ट्विटमुळे बोर्डाची प्रतिमा डागाळली असल्याचा या सदस्यांचा दावा आहे. झिम्बाब्वे बोर्डाने त्याच्यावर कारवाई केल्यास बर्ल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पत्रकार अॅडम थिओ यांनी याबाबत ट्विट करत या कारवाईचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘झिम्बाब्वे क्रिकेटची कार्यपद्धती पाहता या प्रकरणात सार्वजनिक कारवाई होणार नाही. बंद दाराच्या आड ही कारवाई होईल. बर्लला आगामी काळात टीममधून वगळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. मी याबाबत चुकीचा ठरावा अशी इच्छा आहे.’ असे ट्विट बर्ल यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण? रेयान बर्लवरही सोशल मीडियावर फाटलेला बूट चिकटवतानाचा एक फोटो शेयर केला होता. या फोटोमध्ये फाटलेल्या बूटासोबत चिकटवण्यासाठी गमही दिसत आहे. ‘आम्हालाही स्पॉन्सर मिळू शकतो का? ज्यामुळे सीरिज संपल्यानंतर आम्हाला बूट चिकटवावे लागू नयेत,’ अशी पोस्ट बर्लने लिहीली. ‘त्या’ मॅचवर मुंबई इंडियन्सनं ट्रोल केल्यानंतर राजस्थान रॉयल्सची मजेशीर प्रतिक्रिया बर्लची पोस्ट पाहून Puma Cricket ने रेयान बर्लला स्पॉन्सर करण्याचं आश्वासन दिलं. बर्लच्या ट्वीटवर प्युमाने रिप्लाय दिला. आता तुम्हाला गम सोबत ठेवायची गरज नाही, आम्ही तुम्हाला आच्छादन देऊ.