मुंबई, 9 जुलै: झिम्बाब्वे आणि बांगलादेश (Zimbabwe vs Bangladesh) यांच्यात हरारेमध्ये टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वेचा बॉलर मुजरबानी (Blessing Muzarabani) आणि बांगलादेशचा तस्कीन अहमद (Taskin Ahmed) यांच्यात भर मैदानात वाद झाला. या वादाच्या वेळी मुजरबानीनं तस्कीन अहमदच्या हेल्मेचं ग्रिल डोक्यानं आणि दातानं दाबलं. या वादाचा व्हिडीओ आता व्हायरल (Viral) झाला आहे. हरारे टेस्टमध्ये अहमदनं 134 बॉलमध्ये 75 रन काढले. अहमद आऊट होत नसल्यानं मुजरबानी वैतागला होता. या मॅचमध्ये बांगलादेशची अवस्था 6 आऊट 132 होती. त्यानंतर महमूदुल्लाह (Mahmudullah) आणि अहमद यांनी 9 व्या विकेटसाठी 191 रनची भागिदारी केली. यामध्ये अहमदचा 85 रनचे योगदान होते. बांगलादेशच्या इनिंगमधील 85 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमधील मुजरबानीचा चौथा बॉल अहमदनं बचावात्मक पद्धतीनं खेळून काढला. मुजरबानीचा तो बॉल खेळल्यानंतर अहमदनं मैदानात हात हालवत ब्रेक डान्सच्या स्टेप केल्या. त्यानंतर मुजरबानी संतापला. तो अहमदच्या दिशेने चालून गेला. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.
बांगलादेशची पहिली इनिंग 468 रनवर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना झिम्बाब्वेनं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 1 आऊट 114 रन केले. बांगलादेशकडे अजूनही 354 रनची आघाडी आहे. मात्र दुसऱ्या दिवशी मुजरबानी आणि तस्कीन अहमद यांच्यात झालेलं भांडण हाच चर्चेचा विषय होता. टीम इंडियावर टीका करणाऱ्या रणतुंगाला श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूनं दाखवला आरसा बांगलादेशकडून तस्कीन अहमदनं 10 व्या नंबरवर येऊन 75 रन काढले. हा अहमदचा टेस्ट कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर आहे. याशिवाय विकेट किपर लिंटन दासनं 95 तर महमूदुल्लाहनं नाबाद 150 रन काढले. झिम्बाब्वेकडून मुजरबानीनं सर्वात जास्त 4 विकेट्स घेतल्या.