JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानी कोचच्या राजीनाम्याचं सत्य उघड, ड्रेसिंग रुममध्ये झाला होता वाद

पाकिस्तानी कोचच्या राजीनाम्याचं सत्य उघड, ड्रेसिंग रुममध्ये झाला होता वाद

पाकिस्तान टीमचा बॅटींग कोच युनूस खाननं काही दिवसांपूर्वी राजीनामा (Younis Khan Resignation) दिला होता. त्याच्या राजीनाम्याचं सत्य आता उघड झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जून: पाकिस्तानी क्रिकेटमधील (Pakistan Cricket) नव्या वाद समोर आला आहे. पाकिस्तान टीमचा बॅटींग कोच युनूस खाननं काही दिवसांपूर्वी राजीनामा (Younis Khan Resignation) दिला होता. टीम इंग्लंड दौऱ्यावर जाण्याच्या दोन दिवस आधीच युनूसनं राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली होती. ड्रेसिंग रुममधील वाद हे त्याच्या राजीमनाम्याचे कारण असल्याचा दावा पाकिस्तानच्या माध्यमांनी केला आहे. पाकिस्तानचे क्रीडा पत्रकार साज सादीक यांनी या युनूसच्या राजीनाम्याचं कारण सांगितलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सेंच्युरीयनमध्ये झालेल्या टी20 दरम्यान युनूस खानचा फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) सोबत झालेल्या वादामुळे युनूसने राजीनामा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. काय आहे प्रकरण? साज सादीक यांच्या दाव्यानुसार, “सेंच्युरीनमधील मॅचच्या दरम्यान युनूस खान टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. त्याने हसन अलीला आईस बाथ (Ice Bath) घेण्यास सांगितले. युनूसचा हा सल्ला हसन अलीने फेटाळला. त्यावेळी त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. नाराज युनूसने हसन अलीला उद्देशून अपशब्द वापरले. या दोघांमधील वाद इतका वाढला की अखेर टीममधील अन्य सदस्यांना येऊन त्यांचे भांडण थांबवावे लागले.

विराटनं तोंड बंद करायला का सांगितले? न्यूझीलंडच्या बॉलरचा खुलासा इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी टीम बॅटिंग प्रशिक्षकाशिवाय जाणार आहे, पण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी प्रशिक्षकाची निवड योग्य वेळी केली जाईल, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सांगितलं आहे. युनूस खानला मागच्या वर्षी नोव्हेंबर 2022 आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपर्यंत दोन वर्षांसाठी प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या