साऊथम्पटन, 24 जून: विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) हे दोघंही प्रतिस्पर्धी टीमचा आदर करणारे कॅप्टन आहेत. तसंच त्यांच्या मनात एकमेकांविषयी देखील मैत्री आणि आदराची भावना आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) संपल्यानंतर याचं आणखी एक उदाहरण दिसलं. सहाव्या दिवशी शेवटच्या सेशनपर्यंत रंगत कायम असलेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव करत विजेतेपद पटकावले. या मॅचचे दोन दिवस पावासाने रद्द झाले. अन्य तीन दिवशी देखील पाऊस आणि खराब प्रकाशामुळे मॅच वारंवार स्थगित करावी लागली. या सर्व अडथळ्यानंतरही दोन्ही टीमनं एकमेकांना तगडी झुंज दिली. मैदानात परस्परांना भिडणाऱ्या खेळाडूंच्या मनात एकमेकांविषयी आदर आहे. हे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या भेटीनंतरही हे पुन्हा एकदा दिसून आले. विराट आणि केनच्या गळाभेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. हा फोटो फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला असून त्यांनी या दोन्ही कॅप्टनशी प्रशंसा केली आहे. ‘स्पिरीट ऑफ गेम’ असं या फोटोचं वर्णन करण्यात येत आहे.
न्यूझीलंडनं तब्बल 21 वर्षानंतर आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. टीमच्या या कामगिरीबद्दल विल्यमसननं समाधान व्यक्त केलं आहे. “ही एक विशेष भावना आहे. एक विजेतेपद जिंकल्यानंतर खूप छान वाटत आहे. मी विराट कोहली आणि भारतीय टीमचे आभार मानतो. त्यांनी खेळताना जिद्द दाखवली. आम्ही पहिल्यांदाच विश्वविजेतेपद घेऊन जाणार आहोत. हे विजेतेपद पटकवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, ते सर्व प्रशंसेसाठी पात्र आहेत. हे विजेतेपद दीर्घकाळ स्मरणात राहील.” अशी भावना विल्यमसननं व्यक्त केली. टीम इंडियाचा पराभव का झाला? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण विराटनंही केलं कौतुक विराट कोहलीनं देखील मॅच संपल्यानंतर बोलताना न्यूझीलंडच्या टीमचं कौतुक केलं आहे. केन (विल्यमसन) आणि पूर्ण न्यूझीलंड टीमचं अभिनंदन. त्यांनी जबरदस्त खेळ केला आणि तीन पेक्षा थोड्या जास्त दिवसांमध्ये विजय मिळवला. त्यांनी आम्हाला दबावात ठेवले. या विजयावर त्यांचाच हक्क आहे." या शब्दात विराटनं प्रतिस्पर्धी टीमच्या कामगिरीचं वर्णन केलं आहे.