JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / तुम्ही यांना ओळखता का? विनोद कांबळीनं शेअर केला मित्रांसोबतचा जुना फोटो

तुम्ही यांना ओळखता का? विनोद कांबळीनं शेअर केला मित्रांसोबतचा जुना फोटो

विनोद कांबळीनं एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तो महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) आणखी काही जुन्या मित्रांसोबत उभा आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो त्याच्या फॅन्ससोबत अनेक फोटो आणि व्हि़डीओ शेअर करतो. कांबळीनं एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तो महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar) उभा आहे. सचिन आणि कांबळी हे जुने मित्र आहेत. त्यांनी मुंबई आणि टीम इंडियासाठी एकत्र क्रिकेट खेळले आहे. कांबळीनं ‘कू अ‍ॅप’वर शेअर केलेल्या फोटोत सचिनसह आणखी दोन क्रिकेटपटू देखील उभे आहेत.  ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा.’ या प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या ओळी कांबळीनं या फोटोला कॅप्शन म्हणून वापरल्या आहेत. कांबळीनं जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये सचिनसह आणखी दोन खेळाडू आहेत. एकाने त्याच्या हातात ट्रॉफी घेतली आहे. कांबळीनं या फोटोबद्दल आणखी माहिती दिलेली नाही. तसंच त्याच्यासोबत असलेल्या दोन खेळाडूंची नावं देखील सांगितलेली नाहीत. या फोटोतील सचिन आणि कांबळी यांना मात्र सहज ओळखता येते.

Koo App Cricket ka function hota hai,tab thoda khel aur Gaana toh banta🏏🎸🎤 View attached media content

- Vinod Kambli (@vinodkambli) 17 Dec 2021

कांबळीचा कानमंत्र टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी (India Tour of South Africa) कांबळीनं भारतीय टीममधील दोघांना कानमंत्र दिला आहे. कांबळीनं अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना बॅटींगच्या टिप्स  दिल्या. मित्राच्या अपघतानंतर सचिन तेंडुलकर भावुक, जीवदान देणाऱ्या पोलिसासाठी लिहिली इमोशनल पोस्ट ‘आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी अजिंक्य आणि ऋषभ यांना ट्रेनिंगमध्ये मदत केल्यामुळे आनंद झाला. यावेळी त्यांना काही मौलिक सल्ले दिले आहेत. माझ्याकडून दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी दोघांना शुभेच्छा!’ अशी प्रतिक्रिया कांबळीनं या भेटीनंततर व्यक्त केली होती. यावेळी कांबळीचा मुलगा ख्रिस्तियानो देखील उपस्थित होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या