मुंबई, 17 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होत आहे. ओमान विरुद्ध पापूआ न्यू गयाना (Oman vs Papua New Guinea) यांच्यातील लढतीनं या वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीला सुरूवात होणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत या स्पर्धेची पात्रता फेरी रंगणार असून 23 तारखेपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होईल. टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या लढतीचं काऊंटडाऊन सुरू झालं असून त्याकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची नेहमीच मोठी गर्दी होते. यंदा कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळूनच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तरीही अवघ्या काही तासांमध्ये या मॅचची तिकीट हाऊसफुल झाली आहेत. सर्व तिकीटांची विक्री झाली असली तरी अजूनही क्रिकेट फॅन्स ही तिकीटं मिळवण्यासाठी ‘वाट्टेल तो मार्ग’ स्विकारण्यासाठी तयार आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीकडंही (Virat Kohli) त्याच्या मित्रांनी या मॅचची तिकीटं मागितली आहेत. स्वत: विराटनंच याचा खुलासा केला आहे. पण आपण त्यांना नकार दिल्याचं विराटनं मजेत सांगितलं. ‘माझ्यासाठी ही अन्य मॅचप्रमाणेच मॅच आहे. या मॅचला खूप हाईप देण्यात येते हे मला मान्य आहे. सध्या या मॅचच्या तिकीटांचे दर खूप वाढले आहेत, इतकंच मला माहिती आहे. माझे मित्रही माझ्याकडं याची तिकीटं मागत आहेत. पण मी त्यांना यासाठी नकार दिला आहे,’ असं विराटनं यावेळी सांगितलं. T20 World Cup नंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा कोच? विराटची पहिली प्रतिक्रिया टी20 वर्ल्ड कपनंतर विराट या प्रकारात टीम इंडियाचा कॅप्टन नसेल. विराटनं मागच्या महिन्यातच याची घोषणा केली आहे. विराटनं यावेळी पुढं सांगितलं की, ‘आमच्यासाठी ही क्रिकेटची एक मॅच आहे. ती मॅच खेळ भावनेनंच खेळली पाहिजे. आम्ही ती त्याच पद्धतीनं खेळू. बाहेर प्रेक्षकांना याबाबत वेगळं वाटत असेल पण आमची वृत्ती व्यवयासायिकच आहे. आम्ही सामान्य मॅचप्रमाणेच याकडं पाहत आहोत.