मुंबई, 30 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात शुक्रवारी दुबईमध्ये हाय व्होल्टेज मॅच झाली. दोन्ही देशांच्या फॅन्समध्ये या मॅचची मोठी उत्सुकता होती. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता मॅच होणार होती. मात्र दुपारपासूनच दोन्ही देशांचे फॅन्स स्टेडियममध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली होती. काही फॅन्स तिकीट न घेताच स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांच्यात जोरदार मारामारी (Pakistan Afghanistan fans Scuffle In Dubai Stadium) झाली. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अफगाणिस्तानच्या क्रिकेट फॅन्स त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामध्ये कुणी स्टेडियमवरील छतावर चढले तर कुणी मारामारी केली. त्यामुळे मॅचची तिकीटं खरेदी केलेल्या काही जणांना स्टेडियममध्ये जाता आलं नाही.
स्टेडियममध्येही मारामारी स्टेडियमच्या बाहेर जे घडलं त्याची पुनरावृत्ती स्टेडियममध्येही झाली. मॅचचा निकाल जवळ येत असतानाच दोन्ही देशांचे फॅन्स चांगलेच उत्साहित झाले होते. त्यांनी आपल्या टीमसा सपोर्ट करतानाच इतरांशी मारामारी सुरु केली. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरक्षा रक्षकांनी कसबसं त्यांना शांत केलं. पाकिस्ताननं मॅच जिंकताच त्यांचा एक फॅन थेट पिचवर दाखल झाला. त्याला पकडताना सुरक्षा रक्षकांना चांगलीच धावपळ करावी लागली.
राशिद खानचा विसर ऑअफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान (Rashid Khan) यांनी या मॅचपूर्वी सर्व फॅन्सना शांततेचं आवाहन केलं होतं.या लढतीकडं खेळाच्या भूमिकेतून पाहयला हवं. जी टीम चांगलं खेळेल ती जिंकेल. फॅन्सनी शांततेनं या मॅचचा आनंद घ्यावा.’ असं राशिद म्हणाला होता. पण या फॅन्सनी राशिदच्या या आवाहनाकडं दुर्लक्ष केलं.