मुंबई, 25 ऑक्टोबर: दुबईमध्ये रविवारी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधील मॅचमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्ताननं टीम इंडियाचा (India vs Pakistan) 10 विकेट्सनं पराभव केला. वर्ल्ड कप इतिहासातील पाकिस्तानचा हा भारतावरील पहिलाच विजय आहे. या विजयाच्या दोन्ही देशांमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानमध्ये या विजयानंतर वर्ल्ड कप जिंकल्याचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी तर हा विजय म्हणजे इस्लामचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे. तर सोशल मीडियावरील काही फॅन्सनी टीम इंडियाच्या पराभवानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने फिक्सिंग केल्याचा आरोप केला आहे. का झाला शमीवर आरोप? मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली. तो बॉलिंगला आला तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी 17 रनची आवश्यकता होती. पाकिस्ताननं 5 बॉलमध्येच हे रन पूर्ण करत टीम इंडियाला पराभूत केलं. त्यानंतर काही फॅन्सनी शमीवर टीका करत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdulla) यांनीही या मुद्यावर जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी रात्री पराभूत झालेला शमी हा एकमेव प्लेयर नाही. याची आठवण त्यांनी करुन दिली आहे. तसंच टीम इंडियाला त्याच्या सहकाऱ्याच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.
टीम इंडियानं दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. आता टीम इंडियाची पुढील लढत 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. भारताला टी20 वर्ल्ड कपमधील आव्हान कायम राखण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियाच्या पराभवाला MS Dhoni जबाबदार, पाकिस्तानच्या TV शो चा निष्कर्ष