मुंबई, 25 ऑगस्ट: अफगाणिस्तानमधील अशांत परिस्थितीमुळे त्यांचा मुख्य क्रिकेटपटू राशिद खान (Rashid Khan) सध्या व्यथित आहे. त्याचे कुटुंब अफगाणिस्तानमध्येच अडकल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. देशातील आणि मनातील अशांत परिस्थितीचा कोणताही परिणाम राशिद खाननं क्रिकेटच्या मैदानात होऊ दिलेला नाही. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 ब्लास्टमध्ये राशिदच्या दमदार बॅटींगमुळे ससेक्स (Sussex) टीमनं सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ससेक्स विरुद्ध यॉर्कशर (Sussex vs Yorkshire) यांच्यातील क्वार्टर फायनलमध्ये यॉर्कशरनं पहिल्यांदा बॅटींग करताना 7 आऊट 177 रन केले होते. त्यांच्याकडून गॅरी बॅलन्स आणि टॉम कोल्हरनं अर्धशतक झळकावलं. हे आव्हान पार करणे ससेक्सला पूर्ण करणे अवघड जाईल असा सर्वांचा अंदाज होता, पण राशिदच्या आक्रमक बॅटींगमुळे सर्व चित्र बदललं. राशिद खाननं फक्त 9 बॉलमध्ये 27 रनची खेळी केली. यामध्ये त्यानं 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. राशिद 18 व्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला तेव्हा ससेक्स टीमला 21 बॉलमध्ये 43 रनची गरज होती. त्यानं जॉर्डन थॉम्पसनला विशेष लक्ष्य केलं. त्याच्या बॉलिंगवर त्यानं दोन सिक्स लगावले. यामध्ये एक महेंद्रसिंह धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट होता.
इंग्लंडचे क्रिकेटपटू कंगाल तर अधिकारी मालामाल, ECB च्या नव्या निर्णयानं मोठी खळबळ राशिदच्या या बॅटींगमुळे मॅचचं संपूर्ण चित्र बदललं, ससेक्सला शेवटी 8 बॉलमध्ये 9 रन जिंकण्यासाठी हवे होते. ख्रिस जॉर्डननं शेवटच्या ओव्हरमध्ये फोर लगावत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राशिदला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानं बॉलिंग करताना 4 ओव्हरमध्ये 25 रन देत एक विकेट घेतली होती.