मुंबई, 19 मार्च : भारतीय क्रिकेटपटू सोशल मीडियावर सक्रीय दिसतात. अनेकदा ते मजेशीर व्हिडिओ शेअर करतात. युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर यांचे व्हिडिओ चर्चेत असतात. आता यामध्ये आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा क्रिकेटपटू सुर्य कुमार यादवने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुर्यकुमार यादवनं वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केलं आहे. नुकताच त्यानं पत्नीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात पत्नी सुर्य कुमारची तक्रार करताना दिसत आहे. टीम इंडियात आतापर्यंत संधी न मिळालेल्या सुर्य कुमारने मजेशीर व्हिडिओ तयार केला आहे. तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये सुर्य कुमारची पत्नी त्याला म्हणते की, तु झोपेत मला शिव्या का देत होतास. यावर सुर्य कुमार म्हणतो की, तुझा गैरसमज होतोय की मी झोपोत होतो. सुर्य कुमारचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याआधीही या पती-पत्नीने सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत.
सुर्यकुमार यादवनं 2015 साली देवांशीसोबत लग्न केलं होतं. दोघेही कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर सुर्य कुमारच्या क्रिकेटमुळे दोघांनाही एकमेकांपासून दूर रहावं लागलं होतं. यातही त्यांचं प्रेम टिकून राहिलं. शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू सुर्य कुमार सध्या फॉर्ममध्ये आहे. त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडला आहे. तरीही टीम इंडियात मात्र जागा मिळालेली नाही. यावर अनेकदा दिग्गज क्रिकेटपटूंनीही सुर्य कुमारची बाजू घेतली आहे. सुर्य कुमार स्वत: म्हटला आहे की टीम इंडियात संधी मिळण्याची वाट बघत आहे. हे वाचा : IPL मध्ये आता आणखी एक ट्वीस्ट, एप्रिलमध्ये नाही तर…