लंडन, 2 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी (Eng vs NZ) महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. तो इंग्लंड टीमचा व्हाईस कॅप्टन (vice captain) बनला आहे. बेन स्टोक्सने (Ben Stokes) दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये ब्रॉडला ही जबाबदारी मिळली आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका आजपासून (बुधवार) सुरु होत आहे. स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंडचा अनुभवी बॉलर आहे. तो 14 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असून त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉड यापूर्वी मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कॅप्टन होता. त्याने 27 टी 20 आणि 3 वन-डे मध्ये इंग्लंडचं नेतृत्त्व केलं आहे. पण टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच त्याला ही जबाबदारी मिळाली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने 146 टेस्टमध्ये 517 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 18 वेळा पाच तर तीन वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ब्रॉडने 121 वन-डेमध्ये 178 तर 56 टी 20 मॅचमध्ये 65 विकेट्स घेतल्यात. तो 2016 नंतर एकही वन-डे आणि टी 20 मॅच खेळलेला नाही. आरोप-प्रत्यारोपांनंतर रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यामध्ये सारं काही आलबेल? कोचनी दिली पहिली प्रतिक्रिया इंग्लंडला रेकॉर्डची संधी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आत्तापर्यंत 105 टेस्ट मॅच झाल्या आहेत. यापैकी इंग्लंडनं 48 तर न्यूझीलंडनं फक्त 11 टेस्ट जिंकल्या आहेत. या मालिकेतील दोन्ही टेस्ट जिंकून न्यूझीलंड विरुद्ध 50 टेस्ट जिंकण्याचा अनोखा रेकॉर्ड करण्याची इंग्लंडला संधी आहे. ट्रेंट बोल्टची माघार? न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल **(**World Test Championship Final) होणार आहे. या मुकाबल्यासाठी स्वत:ला ताजातवाना आणि फिट ठेवण्यासाठी बोल्ट इंग्लंडविरुद्धची सीरिज खेळणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये तो खेळेल, असं मला वाटतं नाही, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टड यांनी दिली आहे.