JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / क्रिकेटपटूंना थेट निवृत्त होण्यास बंदी, बोर्डाने लागू केले कठोर नियम

क्रिकेटपटूंना थेट निवृत्त होण्यास बंदी, बोर्डाने लागू केले कठोर नियम

श्रीलंकेत दोन क्रिकेटपटूंनी अचानक निवृत्ती घेतल्याने सध्या खळबळ उडाली आहे. या दोघांच्या निर्णायनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) क्रिकेटपटूंच्या निवृत्तीबाबत नवे नियम लागू केले आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जानेवारी : श्रीलंकेत  दोन क्रिकेटपटूंनी अचानक निवृत्ती घेतल्याने सध्या खळबळ उडाली आहे. भानुका राजपक्षानं (Bhanuka Rajapaksa) अचानक निवृत्ती घेतल्यानंतर दानुष्का गुणतालिकानं (Danushka Gunathilaka) टेस्ट क्रिकेटमध्ये यापुढे खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. या दोघांच्या निर्णायनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) क्रिकेटपटूंच्या  निवृत्तीबाबत नवे नियम लागू केले आहेत. हे नियम निवृत्ती घेतलेल्या तसंच भविष्यात निवृत्ती घेण्याची योजना असणाऱ्या सर्व खेळाडूंना लागू होणार आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नव्या नियमानुसार नॅशनल टीमकडून खेळणाऱ्या खेळाडूंना निवृत्तीच्या तीन महिने आधी बोर्डाला नोटीस द्यावी लागेल. विदेशी टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी निवृत्तीच्या तारखेनंतर सहा महिन्यांनी खेळाडूंना बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळेल. निवृत्ती घोषणा केलेल्या खेळाडूंना लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) स्पर्धेत खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमधील 80 टक्के सामने खेळावे लागतील. श्रीलंका क्रिकेट बोर्ड सध्या अडचणीतून जात आहे. देशातील महान क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा वारसदार अजून श्रीलंका क्रिकेटला मिळालेला नाही. मागील काही महिन्यात अनेक खेळाडूंना बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली, यापैकी कुणीही मोठा प्रभाव निर्माण करण्यात अपयश ठरले आहे. IND vs SA : तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाचे केपटाऊनमध्ये जोरदार स्वागत, VIDEO खेळाडूंमध्ये नाराजी श्रीलंका क्रिकेटपटू भानुका राजपक्षानं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लागू केलेल्या फिटनेस नियमावलीवर नाराजी व्यक्त केली आहे. या नियमांमुळे आपण पुढे खेळू शकणार नाही, अशी घोषणा त्याने केली आहे. बोर्डाने खेळाडूंचा फिटनेस सुधारण्यासाठी गेल्यावर्षी दोन किलोमीटर पळण्याची फिटनेस टेस्ट सुरू केली आहे. सुरुवातीला ही टेस्टपूर्ण करण्यासाठीची मर्यादा 8.35 मिनिटे होती. ती आता 8.55 मिनिटे अशी वाढवण्यात आली आहे. हे अंतर वेळेत पूर्ण न करणाऱ्या खेळाडूंच्या वार्षिक करारातील काही रक्कम कापून घेण्यात येणार आहे. त्यावर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या