मुंबई, 16 जुलै: श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुथय्या मुरलीधरनला (Muthiah Muralidaran) फक्त त्याच्या पिढीतील नाही तर ‘ऑल टाईम ग्रेट’ बॉलर मानले जाते. मुरलीधरननं 133 टेस्टमध्ये 22.7 च्या सरासरीनं 800 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर या दिग्गज खेळाडूच्या नावावर 534 वन-डे आणि 13 टी20 विकेट्स आहेत. मुरलीधरन टेस्ट आणि वन-डेमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा बॉलर आहे. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वात जास्त 1347 विकेट्स घेतल्या आहेत. मुरलीधरन त्याच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने जगभरातील दिग्गज बॅट्समनना स्पिनच्या तालावर नाचवले होते. आता मुरलीधरनचा मुलगा नरेन देखील वडिलांच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये नरेन नेट्समध्ये बॉलिंग करत आहे. या व्हिडीओमधील खास गोष्ट म्हणजे मुरलीधरनच्या मुलाची बॉलिंग अॅक्शन अगदी मुरलीधरनसारखी आहे.
मुरलीधनरनं 1992 ते 2011 यीा काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. तो 1996 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंका टीमचा सदस्य होता. त्याने फायनलमध्ये 10 ओव्हरमध्ये 31 रन देत 1 विकेट घेतली होती. त्यानंतर मुरली 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्येही खेळला. 2011 वर्ल्ड कपची फायनल ही त्याच्या वन-डे करियरमधील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती. त्या फायनलमध्ये मुरलीनं 8 ओव्हरमध्ये 39 रन दिले. पण, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पंत, साहा क्वारंटाईन; मग आता इंग्लंडमधील कॉमेंटेटर खेळण्यासाठी सज्ज! शेअर केला खास PHOTO मुरलीधरन 2008 ते 2014 या काळात आयपीएल स्पर्धेत खेळला. आयपीएलमध्ये त्याने 66 मॅचमध्ये 63 विकेट्स घेतल्या. सध्या तो सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीमचा बॉलिंग कोच आहे.