मुंबई, 17 सप्टेंबर : विराट कोहलीनं (Virat Kohli) वर्क लोडचं कारण देत टी20 टीमची कॅप्टनसी सोडत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानं यावेळी स्वत:च्या कॅप्टनसीबद्दल काहीही सांगितलेलं नाही. 2020 नंतर टीम इंडियानं फक्त 8 टी 20 मॅच खेळल्या आहेत. त्या परिस्थितीमध्ये त्यानं दिलेलं कारण किती योग्य आहे? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या आगामी कोचची वाटचाल आणखी खडतर असणार आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ मधील वृत्तानुसार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं टी20 सामने सलग जिंकले तर त्याला वन-डे टीमची कॅप्टनसी देण्यात येऊ शकते. 2023 साली भारतामध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपच्यापूर्वी रोहित शर्माला वन-डे टीमची कॅप्टनसी दिली जाऊ शकते. पण आता विराटनं चेंडू बीसीसीआय आणि निवड समितीच्या कोर्टात टाकला आहे. अर्थात, बीसीसीआय वन-डे टीमचा कॅप्टन बदलण्याची काही करणा नाही. रोहित शर्मा कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो त्यावरही बरंच अवलंबून असेल. त्यामुळे बीसीसीआय काही काळ वाट पाहण्याची शक्यता आहे. ‘विराट आणि BCCI मध्ये सर्व आलबेल नाही’, दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा नव्या कोचसमोर आव्हान टीम इंडियाचे सध्याचे हेड कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी 20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. शास्त्री यांच्या कार्यकाळात विराटला पूर्ण स्वातंत्र्य होते. आता नव्या कोचची कार्यपद्धती कशी असते? यावर सर्वांचं लक्ष असेल. त्याला टीममधील दोन सर्वाधिक सिनिअर खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात समन्वय ठेवण्याचं काम करावं लागेल. विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. तर रोहित शर्मानंही त्याच्यातील नेतृत्त्वक्षमता सिद्ध केली आहे.