मुंबई, 31 डिसेंबर : टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या वर्षीच्या बेस्ट टी20 खेळाडूंच्या रेसमध्ये आहे. आयसीसीनं (ICC) या वर्षीच्या पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर केले आहेत. यामध्ये स्मृतीची टक्कर इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट आणि नेट साइवर तसेच आयर्लंडच्या गॅबी लुईस यांच्याशी आहे. स्मृतीनं 2021 मधील 9 टी20 मॅचमध्ये 32 च्या सरासरीनं 255 रन काढले आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील. भारताच्या कोणत्याही पुरष खेळाडूला वन-डे किंवा टी20 प्रकारातील बेस्ट क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामंकन मिळालेलं नाही. आयसीसीनं वन-डे मधील पुरस्कारासाठी 4 पुरूष खेळाडूंची नामांकनं जाहीर केली आहेत. यामध्ये पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) , बांगलादेशचा शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगचा समावेश आहे.टेस्ट क्रिकेटमधील बेस्ट खेळाडू पुरस्कारासाठी आर. अश्विनला (R. Ashwin) नामांकन मिळालं आहे. अश्विननं यावर्षभरात 54 विकेट्स घेतल्या आहेत. स्मृतीनं यावर्षी टी20 इंटरनॅशनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावले आहे. तर आयपर्लंडच्या गॅबी लुईसनं 10 टी20 मॅचमध्ये 41 च्या सरासरीनं 325 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा सामावेश आहे. ती आयर्लंडकडून शतक झळकावणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे. लुईसच्या बॅटींगमुळे आयर्लंडनं 2 सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. IND vs SA : वामिकानं केलं विराटला चिअर, अनुष्काच्या मांडीवर बसून पाहिला ऐतिहासिक विजय! Photos इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट आणि नेट साइवर यांनाही 4 खेळाडूंच्या यादीत जागा मिळाली आहे. ब्यूमोंटनं 9 मॅचमध्ये 34 च्या सरासरीनं 303 रन काढले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर साइवरनं 9 मॅचमध्ये 19 च्या सरासरीनं 153 रन काढले आहेत. तसंच 20 च्या सरासरीनं 10 विकेट्सही मिळवल्या आहेत.