मुंबई, 5 डिसेंबर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचे देव मानले जाते. सचिनची लोकप्रियता आजही कायम आहे. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील कायम चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती स्वत:चे अपडेट सर्वांशी शेअर करते. सारानं नुकताच तिच्या डेट नाईट (Sara Tendulkar’s Date Night) फोटो शेअर केला आहे. या फोटोत सारानं एका खास व्यक्तीचा हात पकडला आहे. सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर ही स्टोरी शेअर केली असून ‘स्पेशल टेट नाईट’ असं वर्णन केले आहे. या फोटोत सारानं बॉलिवूडची गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) सोबतचा फोटो शेअर केला असून त्यामध्ये तिने कनिकाचा हात पकडला आहे. कनिकानंही तिच्या अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केलाय. सारा आणि कनिका या अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत. त्या दोघींना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. काही दिवसांपूर्वी सारा आणि कनिका या दोघी लंडनमध्ये एकत्र दिसल्या होत्या.
प्रेमाची कबुली सारानं यापूर्वी तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. सारानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ती तिची आई अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) सोबत होती. साराच्या लहानपणीचा तो फोटो होता. या फोटोत ती आईच्या मांडीवर बसली होती. ‘माझी आई आहे तिथंच माझं घर आहे. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ती माझी सर्वात चांगली मैत्रिण आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करते.’ अशी भावना सारानं व्यक्त केली होती. केएल राहुलने आथियाच्या भावासोबत शेयर केला PHOTO, पण कॅप्शनमुळे झाला ट्रोल! साराचं नाव अनेकदा टीम इंडियाचा क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) सोबत जोडले जाते. हे दोघे अनेकदा पार्टी तसंच कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. असं असलं तरी अद्याप दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे या रिलेशनशिपवर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.