मुंबई, 13 जानेवारी : टीम इंडियाचा अव्वल ऑल राऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. फॅन्समध्ये त्याची ‘सर जडेजा’ अशी ओळख आहे. जडेजानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो साऊथ सुपर स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) खतरनाक लूकमध्ये दिसतोय. जडेजानं अल्लू अर्जुनच्या सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa: The Rise) सिनेमातील आहे. जडेजाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. या फोटोत जडेजा अर्जुनसारखी बिडी पित आहे. त्याचबरोबर त्याने पुष्पा सिनेमातील एक डायलॉग लिहला असून सोबत इशाराही दिला आहे. ‘हा प्रातिनिधिक फोटो आहे. सिगारेट, बिडी, तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याचे सेवन करू नका.’ असे जडेजाने म्हंटले आहे.
जडेजा पुष्पा सिनेमाचा फॅन आहे. त्याने यापूर्वी देखील या सिमेमातील एक डायलॉग म्हणत खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पुष्पा सिनेमा 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
जडेजा दुखापतीमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिजमधून बाहेर आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) उपचार घेत आहे. आगामी आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) त्याला महेंद्रसिंह धोनीपेक्षा (MS Dhoni) जास्त किंमत देऊन रिटेन केले आहे. VIDEO: पुण्यातला गाणारा पोलीस पुन्हा चर्चेत; ‘पुष्पा’च्या श्रीवल्लीचा केला रावडी मराठी रिमेक