मुंबई, 31 जानेवारी: पाकिस्तानच्या क्रिके टीमचा (Pakistan Cricket Team) कॅप्टन बाबर आझमसाठी (Babar Azam) 2021 हे वर्ष खास ठरले. त्याची आयसीसी वन-डे आणि टी20 टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर ‘वन-डे प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्काराचाही तो मानकरी ठरला आहे. 2022 मध्ये त्याला हे सातत्य कायम राखता आलेलं नाही. पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) स्पर्धेतील पहिल्या तीन्ही मॅचमध्ये बाबर फेल गेला आहे. पहिल्या तीन मॅचमध्ये मिळून त्याला 100 रन देखील करता आलेले नाहीत. बाबरनं 2021 साली टी20 क्रिकेटमध्ये 1700 पेक्षा जास्त रन केले होते. दुसरिकडं इंग्लंडचा 20 वर्षांचा खेळाडू विल्यमनं 2 मॅचमध्येच 100 पेक्षा जास्त रन केले आहेत. बाबर कराची किंग्ज (Karachi Kings) टीमचा कॅप्टन आहे. त्याच्या टीमनं पहिल्या तीन्ही मॅच गमावल्या आहेत. याचा अर्थ तो कॅप्टन म्हणून देखील फेल गेला आहे. बाबरनं रविवारी लाहोर कलंदर्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (Karachi Kings vs Lahore Qalandars) 41 रन काढले. ही खेळी करण्यासाठी त्याने 33 बॉल घेतले. लेग स्पिनर राशिद खाननं (Rashid Khan) त्याला बोल्ड केले. पीएसएलमधील या सिझनमध्ये बाबरनं आत्तापर्यंत 91 बॉलमध्ये 96 रन काढले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 105 आहे. टी20 क्रिकेटसाठी हा खराब स्ट्राईक रेट आहे. ‘या’ 5 खेळाडूंवर लागणार 10 कोटींपेक्षा जास्त बोली, प्रत्येक जण आहे मॅच विनर रविवारच्या मॅचमध्ये बाबरच्या कराची किंग्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 170 रन केले. शर्जील खाननं 39 बॉलमध्ये 60 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने 8 फोर आणि 3 सिक्स लगावले. पीएसएलच्या या सिझनमध्ये आत्तापर्यंत 5 खेळाडूंनी 100 पेक्षा जास्त रन केले आहेत. यापैकी शर्जील खानचा अपवाद वगळता अन्य 4 जणांनी फक्त 2 सामने खेळले आहेत. बाबरला 3 मॅचनंतरही 100 रन करता आलेले नाहीत. एहसान अलीनं सर्वाधिक 130 रन केले आहेत. मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) 2 मॅचमध्ये एका अर्धशतकासह 121 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 130 आहे. जो बाबर आझमपेक्षा खूप चांगला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये लाहोर कलंदर्सनं कराची किंग्सवर 6 विकेट्सनं विजय मिळवला. त्याबरोबरच बाबरच्या टीमची पराभवाची हॅट्ट्रिक पूर्ण झाली आहे.