मुंबई, 7 फेब्रुवारी : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझमसाठी (Babar Azam) मागचं वर्ष चांगलं ठरलं. त्याने वर्षभरात सातत्यानं रन केले. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीनं त्याला अनेक पुरस्कारही दिले. पण, बाबरसाठी हे वर्ष खराब जात आहे. विशेषत: पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) स्पर्धेत बाबर बॅटर म्हणून प्रभाव टाकण्यात अपयशी ठरला आहे. त्याचा परिणाम तो कॅप्टन असलेल्या कराची किंग्स (Karachi Kings) टीमच्या कामगिरीवर होत आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या बाबरसाठी सातवा सिझन निराशाजनक गेला आहे. या सिझनमधील पाच मॅचमध्ये त्याने फक्त 194 रन केले असून एकच अर्धशतक काढले आहे. संथ खेळ ही त्याची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. बाबर आझम पाकिस्तान आणि कराची किंग्सचा ओपनर आहे. टीमचा ओपनर म्हणून वेगानं रन करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो यामध्ये साफ अपयशी ठरत आहे. त्याने फक्त 118 च्या ,स्ट्राईक रेटनं रन केले आहेत. लाहोर कलंदरकडून खेळणारा बाबरचा सहकारी फखर जमां या स्पर्धेत यशस्वी ठरतोय. त्याने आत्तापर्यंत 286 रन केले असून त्याचा स्ट्राईक रेट 178 इतका आहे. ऑस्ट्रेलियन कोचनं राजीनामा देताच दाखवला खेळाडूंना आरसा, माफी मागत केली टीका बाबर आझमनं पेशावर जाल्मी विरूद्ध सर्वाधिक 90 रन काढले. त्यानंतरही तो टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. इल्लामाबाद विरूद्ध तर तो फक्त 8 रन काढून आऊट झाला. कॅप्टन म्हणून देखील तो अपयशी ठरला आहे. त्याच्या टीमनं सर्व पाचही मॅच गमावल्या असून टीमचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे.